Hardik-Natasha Wedding: क्रिकेटर हार्दिक पांड्या राजस्थानच्या उदयपूरमध्ये पुन्हा एकदा लग्नासाठी सज्ज झाला आहे. आज तो त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न करणार आहे. २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे या जोडप्याने अत्यंत साधेपणाने लग्न केले. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी ३१ मे २०२० रोजी कोर्ट मॅरेज केले होते. कोरोनाच्या काळात दोघांनी अगदी खासगी पद्धतीने लग्न केले आणि सोशल मीडियावर असेच फोटो शेअर केले. कोरोना महामारीमुळे लादलेल्या निर्बंधांमुळे लग्नाला एकही पाहुणे आले नाही. मात्र, यावेळी दोघेही पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाची तयारी उदयपूरमध्ये सुरू आहे. आज मेहंदी समारंभासह हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पारंपारिक रीतीरिवाजांसह, आज व्हॅलेंटाइन डेला दोघेही सात फेरे घेतील.

उदयसागर तलावाच्या मधोमध बनवण्यात आलेल्या फाइव्ह स्टार हॉटेल राफेल्समध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये हा कार्यक्रम १६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानुसार आज दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तर स्वागत सोहळा उद्या म्हणजेच बुधवारी ठेवण्यात आला आहे. हॉटेलमध्ये अखंड तयारीची प्रक्रिया सुरू आहे. सजावट आणि इतर सामानांनी भरलेले ट्रक सतत येत-जातात. हॉटेलच्या आत आणि बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. लग्नाच्या तयारीसाठी दिल्लीहून सजावट आणि फुले आणण्यात आली आहेत.

Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

हेही वाचा: WPL 2023: ‘MI पलटण आता मजबूत कुटुंब!’ रोहितने केला कौतुकाचा वर्षाव तर अपेक्षा पूर्ण करण्याचा हरमनप्रीतचा निर्धार

हार्दिकने प्रेमविवाह केला होता

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा यांचा शुभ्र विवाह होणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच, वधू पांढरा गाऊन परिधान करेल आणि लग्नाची संपूर्ण थीम पांढरी असेल. इतकंच नाही तर टेबल कव्हरपासून टेबल कव्हरपर्यंत सगळ्या गोष्टींचा रंग पांढरा आहे. म्हणूनच याला व्हाईट वेडिंग म्हणतात. ख्रिश्चन समाजात विवाह हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी नताशा आणि हार्दिकने ३१ मे २०२० रोजी कोर्ट मॅरेज केले होते. कोर्ट मॅरेजला त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. हार्दिकला दोन वर्षांचा मुलगाही आहे.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: कोण म्हणतं की कसोटी क्रिकेट संपल, दिल्लीतील सामन्याची सगळी तिकिटे सोल्ड आउट; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

विराट कोहलीचा समावेश होऊ शकतो

खरं तर, हार्दिक पांड्या आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सोमवारी मुंबईहून उदयपूरला पोहोचले. क्रिकेट समालोचक जतिन सप्रू आणि इशान किशन यांनाही सोमवारीच उदयपूरच्या दाबोक विमानतळावर स्पॉट करण्यात आले. आज म्हणजेच मंगळवारी क्रिकेटर अजय जडेजा उदयपूर विमानतळावर पोहोचला. यानंतर तो हार्दिक पांड्याच्या लग्न समारंभाच्या ठिकाणी रवाना झाला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी हार्दिक, नताशा, त्यांचा मुलगा अगस्त्य पांड्या आणि क्रिकेटर कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उदयपूरला पोहोचले.

Story img Loader