आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची अनेक जणांनी कपिल देव यांच्याशी तुलना केली होती. खुद्द कपिल यांनीही अनेकवेळा हार्दिकच्या खेळाचं कौतुक केलं आहे. मात्र भारताच्या आफ्रिका दौऱ्यानंतर कपिल देव यांनी हार्दिक पांड्याला आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचा सल्ला दिलेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन कसोटीत ९३ धावांचा अपवाद वगळता एकाही सामन्यात हार्दिकला आपल्या फलंदाजीची कमाल दाखवता आली नव्हती.

“हार्दिकने आपल्यातली गुणवत्ता याआधीच सिद्ध केली आहे. मात्र सध्या हार्दिकची कोणासोबतही तुलना करणं टाळलं पाहिजे. यामुळे हार्दिकवर दबाव येऊ शकतो. त्याच्यातल्या गुणवत्तेप्रमाणे त्याने खेळ केल्यास तो नक्कीच चांगला फलंदाज बनू शकेल.” एका खासगी पुरस्कार सोहळ्यात पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – …म्हणून धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा नसतो

हार्दिक संघात गोलंदाज किंवा फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करु शकतो. मात्र एकाच वेळी दोन्ही ठिकाणी त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. माझ्या मते हार्दिक फलंदाजीमध्ये चांगला अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. हार्दिक अजुनही तरुण आहे, त्यामुळे आपल्या फलंदाजीवर लक्ष दिल्यास त्याचा खेळ आणखी सुधारेल. गोलंदाजीसाठी त्याला फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही. हार्दिकच्या खेळाचं कौतुक करताना कपिल देव बोलत होते.

Story img Loader