IND vs SL T20I Series: भारताच्या टी-२० विश्वचचषक संघातील अनेक खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) टी-२० मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या मालिकेपूर्वी हार्दिक पंड्याची सर्वाधिक चर्चा होती. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टी-२० विश्वचषक संघाचा उपकर्णधार असल्यामुळे हार्दिक रोहित शर्माचा उत्तराधिकारी असल्याचे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. निवड समितीने सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून निवडले. पण यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी पल्लेकले येथे सराव करत आहे. या सरावादरम्यान अभिषेक नायर आणि हार्दिक पंड्या यांच्यात नेमकं काय झालं, जाणून घ्या.
श्रीलंकेत पहिल्या सराव सत्रादरम्यान भारताचे खेळाडू सहभागी झाले होते. पल्लेकले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाचे खेळाडू सराव करत होते. ज्यामध्ये भारताचे नवे सहाय्यक कोच अभिषेक नायरही मैदानात होते. हार्दिकने नवे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली फलंदाजी केली. सिम्युलेशन सरावादरम्यान, हार्दिक पंड्या आणि फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर एका चौकारावर चर्चा करत होते. मैदानाजवळील रेव्हस्पोर्ट्सच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही ही चर्चा करताना आमनेसामने उभे ठाकले होते, ज्यात खेळीमेळीचे वातावरण होते.
हार्दिक आणि अभिषेकमध्ये मैदानात नेमकं काय घडलं?
हार्दिकने फलंदाजी करताना पॉइंट एरियावर शॉट मारला आणि लगेचच दावा केला की तो एक चौकार आहे, पण नायरने असहमती दर्शवली आणि सांगितले की त्या भागात त्याचा एक क्षेत्ररक्षक आहे. जेव्हा हार्दिकने क्षेत्ररक्षका नेमका कुठे उभा आहे हे विचारले तेव्हा नायरने लाल टी-शर्ट घातलेला रिपोर्टर उभा होता तिथे बोट दाखवले. हार्दिकच्या विनंतीवर नायरने रिपोर्टरला शॉटबद्दल विचारले असता तो म्हणाला- जर तुम्ही तुमचा फील्डर इथे ठेवला असेल तर हा चौकार आहे. ज्या पत्रकाराला नायर यांनी हा प्रश्न विचारला तो व्यक्ती चाहता आहे असे त्यांना वाटले होते.
हार्दिकने शेवटी सिम्युलेशन सराव सत्र जिंकले आणि दोन सराव सत्राच्या शेवटी रिपोर्टरशी संवादही साधला. गेले काही आठवडे हार्दिकसाठी कठीण होते. त्याने केवळ कर्णधारपद गमावले नाही तर पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोटाही झाला. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर हार्दिक मायदेशी परतणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो एकदिवसीय मालिका खेळणार नाही.