Hardik Natasa Divorce Rumors: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोर धरून आहेत. या प्रकरणात काही ना काही नवी घडामोड रोज घडत आहे. पण या दोघांनीही घटस्फोट प्रकरणावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आता हार्दिक आणि नताशाच्या एका जवळच्या मित्राने मोठा खुलासा केला आहे की हे जोडपे अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि किमान सध्या तरी त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आहे.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचे २०२० मध्ये लग्न झाले. या दोघांनाही अगस्त्य नावाचा मुलगा आहे. पण नताशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘पंड्या’ हे आडनाव काढून टाकले होते. याशिवाय नताशाने तिच्या अकाऊंटवरून नताशा आणि तिचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे नताशा आणि ह्रार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. याच कारणामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला
हार्दिक आणि नताशाच्या एका जवळच्या मित्राने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, “हार्दिक पंड्या आणि नताशा अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात ते खरोखरच समस्यांचा सामना करत आहेत. नताशा हार्दिकसोबत राहत नाही. ते एकत्र पुन्हा राहू लागतील की नाही माहिती नाही. कदाचित येतीलही. दोघेही आधुनिक विचारांचे आहेत.”
अलीकडेच, भारतीय संघाची पहिली तुकडी २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. यात कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि राखीव खेळाडू शुभमन गिल आणि खलील अहमद यांचा समावेश आहे. पण हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ चा हंगाम संपल्यानंतरच अज्ञात ठिकाणी कुठेतरी गेल्याची चर्चा सुरू होती. हार्दिक थेट वर्ल्डकप संघामध्ये सहभागी होईल असे म्हटले जात आहे. आता पहिल्या सराव सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या भारतीय संघात दाखल झाल्याची पोस्ट त्याने स्वत शेअर केली आहे.
हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल
हार्दिक आणि नताशा एकत्र राहत नसले तरी त्यांचा मुलगा अगस्त्य पंड्या हा हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मासोबत राहत आहे. कृणालने अगस्त्य आणि त्याच्या मुलासोबतचा फोटो आयपीएलनंतर शेअर केला होता. ज्याच्यावर नताशाने स्माईल, हार्ट इमोजीसह कमेंट केली होती, ज्याच्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले होते. तर त्याचबरोबर आता पंखुरीने एक व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अगस्त्य कृणाल आणि पंखुरी यांच्यासोबत खेळताना दिसत आहे.