आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटाकडे जात आहे. हे पर्व संपत असतानाच आता भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी तर कोणाला डच्चू मिळणार याचे ठोकताळे बांधले जात आहेत. असे असतानाच आता वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यासोबतच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्या किंवा शिखर धवन यांच्यापैकी एकावर सोपवली जाणार, अशी माहिती मिळतेय.
हेही वाचा >> Andrew Symonds चा कार अपघातात मृत्यू; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले
येत्या ६ ते १९ जून या कालावधित भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच दिवसीय टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेदरम्यान निवड समिती अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रित बुमराह अशा खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधित संघाची धुरा हार्दिक पांड्या किंवा शिखर धवन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. तसा विचार सुरु आहे. मात्र या दोघांपैकी कोणाचे नाव आघाडीवर आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचा >> अंबाती रायडू खरंच निवृत्त होणार? चेन्नईच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या चांगली कामगिरी करताना दिसतोय. गोलंदाजी तसेच फलंदाजी या दोन्ही विभागांत त्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच कर्णधार म्हणून तो संघाला आतापर्यंत योग्य दिशा देत आला आहे. कदाचित याच कारणामुळे गुजरात टायटन्स हा संघ १२ पैकी ९ सामने जिंकू शकला आहे. हा संघ प्लेऑफसाठी पात्रदेखील ठरला आहे. त्यामुळे ही कामगिरी पाहता हार्दिक पांड्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्यावर विचार सुरु आहे.
हेही वाचा >> आयपीएल मॅच फिक्सिंग-सट्टेबाजी प्रकरणी CBIची मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
तसेच सध्या पंजाब किंग्ज संघाकडून खेळत असलेला शिखर धवन हा खेळाडूदेखील चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो पंजाबचा कर्णधार नसला तरी फलंदाजीच्या माध्यमातून त्याने अनेकवेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असल्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची माळ त्याच्यादेखील गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> नाद करा पण आमचा कुठं! विराट कोहलीने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू
दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात ९ ते १९ जून या काळात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर लगेच २६ जून आणि २८ जून या कालावधित भारत-आयर्लंड यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लकवरच संघ आणि कर्णधार निश्चिती होण्याची शक्यता आहे.