भारतीय संघातील धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात हार्दिकच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताला विजय मिळवता आला. त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र स्तुती सुरू आहे. या दरम्यान, हार्दिकचा आपल्या पत्नीसोबत एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिकचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना कायम भूरळ घालते. हार्दिकने दुबईतील एक यॉटमध्ये नताशाला प्रपोज केले होते. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगादेखील आहे. नुकताच दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोघांनी अमेझॉनच्या अॅलेक्सा ओरिजिनल्ससाठी एक रोमँटिक व्हिडीओ चित्रित केला आहे.

दुखापतीनंतर पंड्याने भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेममध्ये त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याला आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले होते. ही मालिकादेखील भारताने जिंकली. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० सामन्यात हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने चार बळीदेखील घेतले होते.

Story img Loader