Anant Ambani Radhika Merchant Sangeet Video: सध्या मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचीच सगळीकडे चर्चा आहे. १२ जुलैला अनंत राधिका मर्चेंटशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी दोघांच्या लग्नाआधीचे समारंभ सुरू आहेत. मामेरू समारंभानंतर त्यांचा जंगी संगीत सोहळा शुक्रवारी (५ जुलैला) मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटी अन् क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली.
मुंबईतील बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत व राधिका यांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात महेंद्रसिंह धोनी व त्याची पत्नी साक्षी धोनी, सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी उपस्थित राहिले. या कार्यक्रमात हार्दिक पंड्यादेखील पोहोचला पण त्याच्याबरोबर पत्नी नताशा नव्हती. हार्दिक त्याच्या कुटुंबाबरोबर या संगीत सोहळ्याला पोहोचला.
हार्दिक पंड्या त्याचा भाऊ कृणाल पंड्या व त्याची पत्नी पंखुरी तसेच क्रिकेटपटू इशान किशन यांच्याबरोबर या संगीत सोहळ्यात आला होता. या चौघांनी फोटोसाठी एकत्र पोज दिल्या. त्यानंतर पापाराझींना हार्दिकला एकट्याला पोजसाठी विचारलं आणि तो आनंदाने थांबला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या संगीत सोहळ्याला हार्दिकने काळ्या रंगाचा सुंदर कुर्ता घातला होता, ज्यावर पांढऱ्या रंगाच्या दोऱ्यांची कलाकुसर करण्यात आली होती. तर, कृणाल व त्याच्या पत्नीने मॅचिंग कपडे घातले होते. इशान किशनने लाल रंगाचे कपडे घातले होते. हार्दिक, कृणाल, पंखुरी व इशान यांच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओत नताशा नसल्याने अनेक चाहत्यांनी तिच्याबद्दल कमेंट्स केल्या आहेत.
‘यांचा घटस्फोट होतोय हे नक्की आहे,’ ‘नताशा तू हार्दिकवर प्रेम करतेस की नाही’, ‘हार्दिकसाठी वाईट वाटतंय,’ ‘अफवा खऱ्या आहेत असं मला वाटतंय’ अशा कमेंट्स नेटकरी हार्दिकच्या या व्हिडीओवर करत आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. भारताने टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर नताशाने सोशल मीडियावर पोस्ट केली नाही, तसेच हार्दिकने घरी मुलाबरोबर सेलिब्रेशन केलं त्यातही नताशा दिसली नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता अनंत व राधिका यांच्या संगीत सोहळ्याला नताशा हार्दिकबरोबर नसल्याने चाहते त्यांच्या घटस्फोटाबद्दल कमेंट्स करत आहेत.