Hardik Pandya as New Captain: टी २० विश्वचषकाची सुरुवात भारतासाठी दमदार झाली होती पण विश्वचषकाचा शेवट टीम इंडियासहित कोट्यवधी चाहत्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला. मात्र आता विश्वचषकातील पराभव पचवून पुन्हा नव्या जोमाने लढण्यासाठी टीम इंडियाचे मेन इन ब्ल्यू सज्ज झाले आहेत. विश्वचषकातील खेळ पाहता मागील काही दिवसात रोहित शर्माच्या कर्णधार पदावरून प्रश्न केले जात आहेत. केवळ क्रिकेटचे चाहतेच नव्हे तर अनेक माजी खेळाडू व दिगज्ज तज्ज्ञांनी सुद्धा रोहितवर सोपवण्यात आलेल्या जबादारीवरून सवाल केले आहेत. अनेकांनी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नेमण्यात यावे असेही सुचवले आहे. पण या सगळ्यात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने मात्र पांड्याच्या नेमणुकीबाबत केलेले विधान सगळ्यांच्याच भुवया उंचावत आहे.
हार्दिकने यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधार पद भूषवले आहे. गुजरात टायटन्स संघाला पहिल्याच वर्षी विजेतेपद मिळवून देण्यात पांड्याचा मोठा वाटा होता. विश्वचषकातही पांड्याने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. आणि आता १८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेत तो भारताचे नेतृत्व करणार आहे.
स्टार स्पोर्ट्स शो ‘मॅच पॉईंट’ वर बोलताना इरफानने निदर्शनास आणून दिले की, हार्दिक एक दुखापतग्रस्त खेळाडू आहे. इरफान म्हणाला की, “जर हार्दिकची दुखापत गंभीर झाली तर टीम इंडिया संकटात सापडेल आणि म्हणूनच भारताने हार्दिक सोबत आणखी एक सक्षम खेळाडू नेमण्याची गरज आहे.
मोहम्मद शमीला उचलून.. भारत हरताच शोएब अख्तरने स्वतः टाकली होती वादाची ठिणगी, ‘हा’ Video पाहा
रोहित शर्माच्या बदलीवरून भाष्य करताना इरफान म्हणाला की, “मुळात कर्णधार बदलला की निकाल बदलतो असे होत नाही, जर कर्णधार उत्तम असेल पण खेळाडूच फॉर्म मध्ये नसतील तर निकाल आहे तसाच राहणार. हार्दिक पांड्या हा वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्तमच आहे मात्र जर तो दुखापतग्रस्त असेल आणि २०२३ च्या विश्वचषकापूर्वी तो ठीक होऊ शकला नाही तर? अशावेळी भारताला धोका निर्मा कडे पर्याय तयार हवेत”
इरफानने याच मुलाखतीत पुढे हार्दिक पांड्याचे कौतुक करता म्हंटले की, “वैयक्तिकरित्या असे वाटते की हार्दिक पांड्या हा एक उत्तम नेतृत्व आहे, त्याने गुजरात टायटियन्समध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, आयपीएल जिंकले आहे, चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. पण भारताला एक नाही तर दोन उत्तम नेतृत्व करू शकणारे खेळाडू शोधण्याची गरज आहे. हाच नियम सलामीवीरांच्या बाबत लागू होतो. आपल्याकडे सलामीवीरांचा एक गट असणे आवश्यक आहे”