Natasa Stankovic first post on insta after divorce : काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळे होण्याची घोषणा केली. लग्नाच्या चार वर्षानंतर या जोडप्याने घटस्फोट घेतला आहे. यानंतर नताशा आपल्या मुलासह सर्बियाला पोहोचली. आता सर्बियाला गेल्यानंतर नताशा स्टॅनकोविकने घटस्फोटानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यावर हार्दिक पंड्याने केलेल्या कमेंटने लक्ष वेधले. ज्यामुळे तिची सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

हार्दिक पंड्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविक सर्बियामध्ये तिच्या मायदेशी पोहोचली आहे. तिने आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने लेक अगस्त्यबरोबर प्राणीसंग्रहालयात फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. नताशाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच या पोस्टवर हार्दिक पांड्याच्या दोन कमेंट आल्या आहेत. त्याने पहिल्या कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या कमेंटमध्ये, नजर लागू नये म्हणून शेअर केला जाणार इमोजी आणि व्वा म्हणणारा हाताचा इमोजी पोस्ट केला आहे. हार्दिकच्या या कमेंटवरही अनेक लाईक्स आहेत.

Kiran Mane
किरण मानेंनी शेअर केला प्रिया बेर्डेंचा जुना व्हिडीओ; म्हणाले, “एका सुपरस्टारच्या पत्नीने…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
zee marathi lakshmi niwas jahnavi shocked after seen jayant real face
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…

२०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते –

हार्दिक आणि नताशाचे लग्न २०२० मध्ये झाले होते. दोघेही पहिल्यांदा २०१८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. या काळातील किस्सा खुद्द हार्दिकनेच सांगितला होता. तो म्हणाला होता की, “नताशाला मी कोण आहे याची कल्पना नव्हती. जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो, तिथे मी टोपी घालून फिरत होतो. मी रात्री एक वाजता टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोलू लागलो.”

हेही वाचा – Hardik Pandya : घटस्फोट आणि कर्णधारपदाच्या हुलकावणीनंतर हार्दिकची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कधीकधी मन…’

नताशाचे हार्दिकशी दोनदा लग्न –

त्यानंतर या जोडप्याने २०२० मध्ये त्यांच्या अँगेजमेंटची घोषणा केली. १ जानेवारी २०२० रोजी एका क्रूझ पार्टीत हार्दिकने नताशाला लग्नाची मागणी घातली. यानंतर, त्यांनी कोविड काळात ३१ मे २०२० रोजी कोर्टात लग्न केले. ३० जुलै २०२० रोजी हे जोडपे त्यांच्या मुलाचे म्हणजे अगस्त्यचे पालक झाले. यानंतर २०२३ मध्ये नताशा आणि हार्दिकने पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले. त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने दोनदा लग्न केले. या जोडप्याचा २ वर्षांचा मुलगाही लग्नाला उपस्थित होता. पण मार्च २०२४ मध्ये त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येऊ लागल्या.

नताशा स्टॅनकोविक अली गोनीला करायची डेट

नताशा स्टॅनकोविक आणि अली गोनी ‘नच बलिए’ सीझन नऊमध्ये एकत्र दिसले होते. ‘नच बलिए’ हा कपल डान्स शो आहे. या शोच्या नवव्या हंगामात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी नताशा आणि हार्दिकचे नाते सर्वांसमोर आले नव्हते. नच बलिए शोच्या एका एपिसोडमध्ये अहमद खानने अली आणि नताशा या दोघांना त्यांच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारला होता. त्याने विचारले, ‘तुमचे ब्रेकअप होऊन पाच वर्षे झाली की, पाच वर्षांनी तुम्ही ब्रेकअप केला?’ यावर अली म्हणाला, ‘नाही, आमचे ब्रेकअप होऊन चार वर्षे झाली आहेत.’ यावेळी नताशा पण म्हणाली होती की हो आमचे ब्रेकअप होऊन चार वर्षे झाली होती.

हेही वाचा – Ajit Agarkar : हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादव का झाला टीम इंडियाचा कर्णधार; अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलं कारण

अली गोनीने यावेळी सांगितले की, ब्रेकअप झाल्यानंतरही तो नताशाला भेटत राहतो. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपला किती वेळ झाला हे ते विसरतात. त्यानंतर नताशा म्हणाली की, तिचे पाच वर्षांत दोनदा ब्रेकअप झाले. विभक्त होऊनही ते पुन्हा पुन्हा एकत्र येत असत. ब्रेकअपचे कारण सांगताना अली गोनी म्हणाला होता की, ‘ संस्कृती वेगळ्या असल्याने आम्हाला वेगळे व्हावे लागले आणि मला एका भारतीय मुलीसोबत राहायचे होते.’ अली गोनीपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट केले. त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि काही महिन्यांतच ते दोघे वेगळे झाले.

Story img Loader