IND vs PAK Updates in Marathi: हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझमला स्वस्तात बाद करून त्याने टीम इंडिया आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उमटवली. यानंतरही तो थांबला नाही, तर त्याने आणखी एक विकेट मिळवली. या विकेटसह हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा टप्पा गाठला आहे.
हार्दिक पांड्याने बाबर आझमला २४ धावांवर बाद करत टीम इंडिया चांगली सुरूवात करून दिली. यादरम्यान त्याने २६ चेंडूंचा सामना केला आणि ५ चौकार लगावले. पण हार्दिक पंड्याच्या भेदक गोलंदाजीला तो बळी पडला. यानंतर हार्दिक पांड्याने सौद शकीललाही बाद करून टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले.
सौद शकीलने पाकिस्तानकडून ६३ धावांची मोठी धावसंख्या उभारत चांगली फलंदाजी करत होता. पण हार्दिक पांड्या दुसऱ्या स्पेलमध्ये येताच त्याने सौदला बाद करत पाकिस्तानच्या मोठ्या धावसंख्येला आळा घातला. सौद शकीलने ७६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. हार्दिकने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.
हार्दिकची उत्कृष्ट कामगिरी
हार्दिकने २ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केले. हार्दिक पांड्याने भारतासाठी ११ कसोटी सामने खेळले असून १७ विकेट घेतले आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने ११४ सामने खेळून ९४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ९० सामने खेळून ८९ विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकत्र २०० विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१४९ धावा केल्या आहेत आणि २०० विकेट्स घेतले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २४१ धावा करत भारताला विजयासाठी २४२ धावांचे आव्हान दिले आहे.