Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce: टी २० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करून हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याचं खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होतं. हार्दिकची पत्नी नताशाने मध्यंतरी आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. आज, १८ जुलैला संध्याकाळी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहीत चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. हार्दिक व नताशाने चार वर्षांनी आपले नाते संपवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हार्दिकने पोस्टमध्ये लिहिले की, “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू. या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या प्रायव्हसीचा आपण आदर ठेवावा अशी विनंती.आपल्याकडून या वेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.- हार्दिक व नताशा”

हार्दिक पांड्याने घटस्फोटावर केला शिक्कामोर्तब (Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce Confirmed)

नताशा स्टॅंकोव्हिक पोस्ट (Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce Confirmed)

हार्दिक व नताशाने ३१ मे २०२० ला लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र त्यांनतर वर्षभरातच पांड्या कुटुंबात सगळं काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता मात्र त्यावेळेस सुद्धा नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. इतकंच नव्हे तर त्यादरम्यान तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या नावातून पांड्या हे आडनाव सुद्धा काढून टाकले होते. काही दिवसांनी नताशाने आपले व हार्दिकचे लग्नाचे फोटो अकाउंटवरून डिलीट केले होते, हे फोटो तिने नंतर रिस्टोअर केल्यावर कदाचित हार्दिकवर होणाऱ्या टीकांवरून लक्ष हटवण्यासाठी तिने असं केलं असावं असाही अंदाज वर्तवण्यात आला होता.

पण त्यानंतर पुन्हा टी २० विश्वचषकाच्यावेळी नताशाने हार्दिकच्या यशातही अजिबात सहभाग घेतला नाही. तिने एकदाही हार्दिकला अभिनंदन करणारी किंवा त्याचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली नव्हती. हार्दिकने सुद्धा मुंबईत परतल्यावर केवळ आपला मुलगा अगस्त्यसह सेलिब्रेशन करून फोटो शेअर केले होते पण त्यातही नताशा दिसली नव्हती. राधिका व अनंत अंबानीच्या लग्नात सुद्धा हार्दिक हा आपला भाऊ कुणाल व टीममधील मित्र इशान किशनबरोबर दिसला होता. अंबानींच्या कार्यक्रमात हार्दिकने अनन्या पांडेसह जोरदार डान्स केल्यावर लोकांनी दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा चालू केल्या.