India vs West Indies 2nd ODI Match Updates: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून या सामन्यात इशान किशनने अर्धशतक झळकावले. यानंतर अॅलिक अथानाझने रोमॅरियो शेफर्डच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल पकडला आणि किशन तंबूत पाठवले. या झेलचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि इशान किशनने पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. शुबमन गिल ४९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत रोमॅरियो शेफर्डने इशान किशनला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Rohit Sharma and Akash Deep injured during practice sports news
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा

इशान किशनने ५५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्याने या खेळी दरम्यान ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला १८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोमॅरियो शेफर्डने अॅलिक अथानाझच्या हाती झेलबाद केले. अॅलिक अथानाझने डायव्हिंग करत जबरदस्त झेल घेतला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यानंतर याच षटकांत रोमॅरियो शेफर्डने भारताला अक्षर पटेलच्या रुपाने तिसरा धक्का दिला. तो एक धाव काढून बाद झाला.

हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: ‘…म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली’; हार्दिक पांड्याने सांगितले कारण

टीम इंडियाला सलग दोन धक्के बसले. हार्दिक पांड्यानंतर संजू सॅमसन बाद झाला. हार्दिक १४ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. संजू सॅमसन १९ चेंडूत ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने २४.१ षटकात ५ बाद ११३ धावा केल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबला आहे. कव्हर्स मैदानावर आले आहेत.

भारताची प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

हेही वाचा – Actor Rajinikanth: ‘आयपीएलमध्ये काव्याची निराशा पाहू वाटत नाही’; अभिनेते रजनीकांत यांनी SRH संघमालकाला दिला ‘हा’ सल्ला

वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन: ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथानाझ, शाई होप (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

Story img Loader