India vs West Indies 2nd ODI Match Updates: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ दोन मोठे बदल करून मैदानात उतरला. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती दिल्याने त्याच्या जागी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. हार्दिक पांड्याने रोहित आणि विराटला का विश्रांती देण्यात आली आहे, याबाबत नाणेफेकी दरम्यान सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती का देण्यात आली?

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या म्हणाला की, या सामन्यात आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. तसेच या वर आणि खाली असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना आपण किती धावा करू शकतो हे पाहायचे आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विश्रांतीनंतर तिसऱ्या वनडेसाठी ते पूर्णपणे फ्रेश होतील.

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, मला वाटते की जेव्हा तुम्ही एखाद्या संघाला ११४ धावांवर आऊट करता, तेव्हा तो गोलंदाजांचा चांगला प्रयत्न असतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आम्ही काही चांगले झेल घेतले पण आम्हाला काही क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे आणि आम्ही ते करू शकतो. पहिल्या सामन्यात पाच विकेट्स गमावण्याऐवजी दोन विकेट्स गमावून खेळ लवकर संपवता आला असता. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Actor Rajinikanth: ‘आयपीएलमध्ये काव्याची निराशा पाहू वाटत नाही’; अभिनेते रजनीकांत यांनी SRH संघमालकाला दिला ‘हा’ सल्ला

सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक गमावून भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला आहे. भारतीय संघाने १७ षटकानंतर १ बाद ९० धावा केल्या आहेत. भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. शुबमन गिल ४९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा काढून बाद झाला. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इशान किशन</p>