संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारताने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार म्हणून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे पाहिले जात आहे. संघ अडचणीत असताना त्याने मैदानात पाय रोवून धडाकेबाज फलंदाजी केली. दरम्यान, त्याने भारताला विजय मिळवून दिला असला तरी या सामन्यादरम्यान तो एका प्रसंगामुळे भावनिक झाला. तो प्रसंग खुद्द हार्दिक पंड्याने सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video : भारत-पाक सामन्यात रोहित शर्मा थोडक्यात बचावला, डोक्याला चेंडू लागून झाला असता जखमी, नेमकं काय घडलं होतं?

हार्दिक पंड्याने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यादरम्यान पंड्या फक्त एकदाच भावनिक झाला. याबद्दल पंड्याने सविस्तर सांगितले आहे. “जेव्हा रवींद्र जडेजा बाद झाला, तेव्हा मी भावनिक झालो. मी भावनिक झालो असलो तरी मी दबावाखाली गेलो नव्हतो. उलट गोलंदाज दबावामध्ये होते, असे मला त्यावेळी वाटत होते. पाकिस्तानी गोलंदाजांची एक चूक मी शोधत होतो. याच चुकीचा फयदा घेऊन मला संघाला विजय मिळवून द्यायचा होता,” असे हार्दिक पंड्याने सांगितले.

हेही वाचा >>> “…ही तर यांची जुनी सवय”, जय शाहांच्या ‘त्या’ कृतीवरुन काँग्रेसचा खोचक टोला

दरम्यान, भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी रविंद्र जडेजा (३५) मैदानात आला. तसेच सूर्यकुमार यादव (१८) स्वस्तात बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. नंतर जडेजा आणि पंड्या या जोडीने ५२ धाावांची भागिदारी केली. ही जोडी भारताला विजय मिळवून देईल असे वाटले होते. मात्र सामना अंतिम टप्प्यात आलेला असताना पाकिस्तानी गोलंदाज नवाजने टाकलेल्या चेंडूवर रवींद्र जडेजा बाद झाला आणि हार्दिक पंड्याने चोख भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya felt emotional when ravindra jadeja out in ind vs pak asia cup 2022 prd