Hardik Pandya Rumoured Girlfriend : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज (२३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई येथील आंदरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असल्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींचं याकडे लक्ष लागलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. या सामन्यादरम्यान बाबर आझमची विकेट हार्दिक पांड्याने घेतली. मात्र, याचवेळी हार्दिक पांड्याची सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणावरून चर्चा रंगली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला चॅम्पियन्स ट्रॉफी सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील दुबईला पोहोचले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड स्टेडियममध्ये झळकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण याबाबत हार्दिक किंवा जस्मिन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, जस्मिन वालिया असं तिचं नाव असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून हार्दिक पांड्याशी तिचं नाव जोडलं जात आहे.

दरम्यान, हार्दिक पंड्याने २०२० मध्ये नताशा स्टॅनकोविचशी लग्न केलं होतं. मात्र, पुढे २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता हार्दिक पंड्याच्या नव्या रिलेशनबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती किंवा कोणाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आज सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान बाबर आझमची विकेट हार्दिक पंड्याने घेतली त्यावेळी जस्मिन वालियाने रिअॅक्शन दिल्याने सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.

कोण आहे जस्मिन वालिया?

मीडिया रिपोर्टनुसार, जस्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आहे. सध्या तिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर आहे. तिने अनेक चित्रपटांमध्येही आपला व्हाईस दिलेला आहे. जस्मिन वालिया तिच्या गाण्यासोबरोबरच आता हार्दिकसोबतच्या नात्याच्या चर्चांमुळे चर्चेत आली आहे.

हार्दिक पंड्या आणि नताशाच्या घटस्फोटाची मोठी चर्चा झाली होती

दरम्यान, हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक या दाम्पत्याचा घटस्फोट काही महिन्यांपूर्वीपर्यंत प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. टी २० वर्ल्डकपदरम्यानही हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सुरुवातीला या दोघांकडून घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, जुलै महिन्यात दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. बरीच चर्चा, शंका-कुशंका, तर्क-वितर्कांना खतपाणी मिळाल्यानंतर हार्दिक पंड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला होता. दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली होती.

Story img Loader