Hardik Pandya had put a condition before the MI team : आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने शुक्रवारी जाहीर केले की, पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये मुंबईचे नेतृत्व रोहित शर्माकडे नाही तर हार्दिक पंड्याकडे असेल. संघाचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबईच्या बाजूने सांगण्यात आले. तसेच फ्रँचायझीने रोहित शर्माच्या योगदानाबद्दल आभार मानले. लोकांच्या दृष्टीने हा निर्णय एका रात्रीत झाला असेल, पण आतले सत्य काही वेगळेच आहे. हार्दिकला कर्णधार बनवण्याची योजना जुनी होती. कर्णधारपदाच्या अटीवरच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेडच्या माध्यमातून सामील करुन घेतले होते, परंतु पडद्यामागील कथा वेगळी आहे. हार्दिक पंड्या इतक्या सहजासहजी मुंबई संघात सामील झाला नाही. पुन्हा मुंबईत येण्यासाठी त्याने मुंबईपुढे अट ठेवली होती की, त्याला संघाचा कर्णधार बनवले तरच परत येईल.

हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सपुढे ठेवली होती कर्णधारपदाची अट –

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सचाय संघ मालकाला स्पष्ट केले होते की, जर त्याला संघाचा कर्णधार नियुक्त केले जाणार असेल, तरच तो मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन करेल. यानंतर बर्‍याच विचारमंथनानंतर, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हार्दिक पंड्याला सहमती दर्शवली आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रोहित शर्माला याची माहिती देण्यात आली. यानंतर रोहित शर्माने संघाच्या भवितव्याचा विचार करुन निर्णय फ्रँचायझीवर सोडला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने हे पाऊल उचलले.

हेही वाचा – IND vs SA : एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! ‘या’ भारतीय खेळाडूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाबद्दल रोहितला दिली होती कल्पना –

२०२३ च्या विश्वचषकादरम्यान एमआयने रोहित शर्माला सांगितले होते की, हार्दिक पंड्या यावेळी पुढील हंगामासाठी कर्णधार म्हणून संघात परतत आहे. त्याला कर्णधार बनवले जाईल या अटीवर पंड्या गुजरातहून मुंबईला येण्यास तयार झाला होता. रोहितला विश्वचषकाच्या सुरुवातीच्या आसपासचा फ्रँचायझी रोडमॅप समजून घेण्यास सांगितले होते. अनेक बैठकांमध्ये त्याला कर्णधारपदात त्वरित बदल करण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली आणि त्याने आगामी हंगामात पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याच्या योजनेला सहमती दर्शवली. अर्थात रोहित शर्मा यापुढे मुंबईचा कर्णधार नसेल, पण तो या संघासोबत फलंदाज म्हणून खेळत राहील आणि त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला देत राहील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya had put a condition before the mi team to give him the captaincy to return to mumbai indians team ipl 2024 vbm