Hardik Pandya In Test Team: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचा टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधार हार्दिक पांड्या कसोटीत परतण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे कसोटी संघापासून दूर आहे. आता बीसीसीआय पुन्हा एकदा त्याला कसोटी क्रिकेटमध्ये परत आणण्याचा विचार करत आहे. हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि बीसीसीआय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याशी याबाबत बोलणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीसीसीआय दबाव आणणार नाही

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याला कसोटीत परत आणण्याची घाई नाही पण हो, काही स्पष्टता असणे चांगले होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी याबद्दल बोलणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत तो इंग्लंडमध्ये संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण कसोटीत लगेच पुनरागमन करण्यासाठी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकावा लागेल.

हेही वाचा: WTC Final: “श्रीलंका न्यूझीलंडला हरवूच शकणार नाही, भारत…”, माजी भारतीय खेळाडूने केले मोठे भाकीत

पुढे बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या तो कसोटी संघात निवडीसाठी उपलब्ध नाही. त्याचा भूतकाळातील दुखापतींचा इतिहास तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवावा लागेल. त्यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची घाई करणे हानिकारक ठरू शकते. पण एनसीए, वैद्यकीय संघ आणि स्वतः हार्दिक पांड्याला वाटत असेल की तो कसोटी पुनरागमनासाठी तयार आहे, तर तो नक्कीच मैदानात उतरेल.”

सध्या भारतीय टी२० संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिकने पाठीच्या दुखापतीनंतर एका वेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या पुनरागमनानंतर, हार्दिक नेहमीपेक्षा अधिक तंदुरुस्त झाला आहे आणि तो बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जसप्रीत बुमराहला शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे ७-८ महिने लागतील. “जर हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान दिले तर सूर्यकुमार यादवच्या जागी मिळणार अशी माहिती देखील त्या अधिकाऱ्याने दिली.” त्यामुळे सुर्याचा यात नाहक बळी जाणार अशी सोशल मीडियात चर्चा आहे.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: ‘थांब विराट जरा धीर धर’, live सामन्यादरम्यान पेटपूजा करताना किंग कोहलीचा Video व्हायरल

विशेष म्हणजे, हार्दिकने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना ३१.२९ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून एक शतक आणि चार अर्धशतके झळकली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या १०८ आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीत ३१.०२ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत.