टी २० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना सूर गवसल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने २ गडी गमवून २१० धावा केल्या आणि विजयासाठी २११ धावांचं आव्हान दिलं. रोहित शर्मान ४७ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात ऋषभ पंत आला. त्यानंतर लगेच केएल राहुल बाद झाला आणि हार्दिक पंड्या मैदानात उतरला. संघाला शेवटच्या काही षटकात मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी या दोन खेळाडूंवर होती. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी मोठे फटके मारत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली
सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शहजादच्या धडकेचा सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. अफगाणिस्ताननं १९ वं षटक नवीन उल हकच्या हाती सोपवलं होतं. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने उंच फटका मारला. मात्र नजिबुल्लाह झाद्रनच्या हातून झेल सुटला आणि हार्दिक पंड्या दुसरी धाव घेण्यासाठी वेगाने धावला. यावेळी थेट यष्टीरक्षक मोहम्मद शहजादला जाऊन धडकला. मोहम्मद शहजाद आणि हार्दिक पंड्याची धडक पाहता समालोचकलाही आपले शब्द आवरता आले नाही. ही दृष्य पाहून नेटकरी मीम्स शेअर करणार नाही, असं होऊ शकत नाही. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव झाला आहे.
भारताचा डाव
मागील सामन्यातील फसलेल्या प्रयोगातून धडा घेत भारताने नियमित सलामीवीर सलामीवीर मैदानात उतरवले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतासाठी चांगली सुरुवात केली. पाच षटकात भारताने अर्धशतक ओलांडले. पॉलरप्लेनंतर भारताचा वेग थोडा मंदावला, पण रोहितने फटकेबाजी करत दबाव कमी केला. १२व्या षटकात रोहितने तर पुढच्याच षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर २४ धावांची भर घालून रोहित बाद झाला. करिम जनतने त्याला तंबूत धाडले. रोहितने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. त्याने राहुलसोबत १४० धावांची सलामी दिली. १७व्या षटकात राहुलही माघारी परतला. नैबने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. राहुलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. या दोघांनंतर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी सूत्रे हातात घेतली. या दोघांनी २१ चेंडूत ६३ धावांची नाबाद भागीदारी केली. जलदगती गोलंदाज हसनने टाकलेल्या २०व्या षटकात पंत-पंड्याने १६ धावा वसूल केल्यामुळे भारताला दोनशेपार जाता आले. २० षटकात भारताने २ बाद २१० धावा केल्या. हार्दिक पंड्याने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ३५ तर ऋषभ पंतने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या.