Hardik Pandya Hugs Suryakumar Yadav Video Viral : बीसीसीआयने नुकतेच टी-२० क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवकडे भारतीय टी-२० संघाची धुरा सोपवली आहे. त्याने कर्णधारपदाच्या शर्यतीत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला मागे टाकले. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात हार्दिक उपकर्णधार होता. अशात हार्दिक आणि सूर्या यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या दोघांनी अशा अटकळांना पूर्णविराम दिला. हार्दिकने विमानतळावर सूर्याची गळाभेट घेतली, ज्याची एक झलक बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. दोघांच्या मिठीचे फुटेज वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय खेळाडू सोमवारी मुंबई विमानतळावरून श्रीलंकेला रवाना झाले. व्हिडीओमध्ये सूर्या बसलेला दिसतो आणि हार्दिक त्याच्याकडे चालत जातो. हार्दिकला येताना पाहून सूर्या लगेच उठतो आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. यांनतर सूर्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो खूप आनंदी दिसत होता. हार्दिक आणि सूर्या हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील भारतीय खेळाडू सोमवारी मुंबई विमानतळावरून श्रीलंकेला रवाना झाले.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्या बसलेला दिसतो आणि हार्दिक त्याच्याकडे चालत जातो. हार्दिकला येताना पाहून सूर्या लगेच उठतो आणि दोघांना मिठी मारतो. ३३ वर्षीय सूर्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो खूप आनंदी दिसत होता. त्याच वेळी, जवळच उभा असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जेव्हा दोन्ही खेळाडू मिठी मारतो तेव्हा हसतो. हार्दिक आणि सूर्या हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघातील सहकारी आहेत.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : सलग पाचव्या ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्यासाठी कुस्तीपटू सज्ज! सरकारने खेळाडूंवर किती केलाय खर्च?

हार्दिकऐवजी सूर्यकुमार का झाला कर्णधार?

पत्रकार परिषदेत निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले, “हार्दिक पंड्या अजूनही आमच्यासाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, त्याच्यासाठी फिटनेस खरोखरच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक, निवडकसमिती आणि संघ व्यवस्थापनाला ते थोडे अवघड जाते. पुढील टी-२० विश्वचषकापूर्वी आमच्याकडे बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला काही गोष्टी प्रयोग करून पहायच्या आहेत. कारण त्यावर सर्वकाही अवलंबून आहे, परंतु हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.”

हेही वाचा – MLC 2024 : चाहतीच्या खांद्याला लागला चेंडू, पोलार्डने केली विचारपूस, घेतली भेट, सेल्फी घेत दिला ऑटोग्राफ

अजित आगरकर पुढे म्हणाले, “केएल राहुलच्या जागी हार्दिक जेव्हा कर्णधार झाला, तेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष नव्हतो. जेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा एकदिवसीय विश्वचषक जवळ येत होता आणि त्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषक होता. हार्दिकसाठी फिटनेस ही समस्या आहे. केवळ फिटनेसच नाही तर सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता जास्त आहे, असे आम्हाला वाटते. दोन वर्षे म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आणि या परिस्थितीत आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग करुण पाहण्यासाठी बराच वेळ आहे.”