Hardik Pandya IPL Trade: भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या T20I मालिकेला मुकण्याची शक्यता आहे, परंतु घोट्याच्या दुखापतीतुन बरा होऊन तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) पूर्वी पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होईल, असे एका सूत्राने ANI ला सांगितले आहे. पंड्या हा भारताच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक संघाचा भाग होता. चार सामने खेळताना त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसह पाच बळी घेतले. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेज सामन्यात घोट्याच्या दुखापतीपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या एकमेव डावात ११* धावा केल्या होत्या. मात्र हार्दिक पंड्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की त्याला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते.
तेव्हापासून पंड्याने कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळलेला नाही, त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची T20I मालिका आणि तीन सामन्यांची T20I आणि ODI मालिकाही गमावली आहे.
सूर्यकुमार यादवने सर्व T20I सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले तर के एल राहुलने पंड्या आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. रोहित शर्माने सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून काही काळ विश्रांतीची विनंती केली होती. वेस्ट इंडिज/यूएसए येथे जूनमध्ये होणार्या आयसीसी टी २० विश्वचषकापूर्वी ११ – १७ जानेवारी दरम्यान होणारी अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची T20I मालिका ही भारताची अंतिम आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी (Hardik Pandya Mumbai Indians Trade)
दुसरीकडे, या वर्षी नोव्हेंबरमध्ये, दोन्ही फ्रँचायझींमधील व्यापारानंतर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स (GT) मधून त्याच्या जुन्या संघात म्हणजेच मुंबई इंडियन्स (MI) मध्ये परतला होता. अष्टपैलू खेळाडूने जीटीसह दोन महत्त्वाची वर्षे खेळताना संघाला २०२२ मध्ये पदार्पणाच्या हंगामातच विजय मिळवून दिला होता. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला एका रोमांचक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या सत्रात उपविजेतेपद मिळविले.
मुंबई इंडियन्ससाठी जेव्हा हार्दिक पंड्याला कर्णधार पद सोपवण्यात आले तेव्हा संघाला सोशल मीडियावर प्रचंड विरोधाला व टीकेला सामोरे जावे लागले होते. मुंबई इंडियन्सच्या संघाने पंड्याला १५ कोटी रुपयात संघात समाविष्ट केले होते तर याव्यतिरिक्त एमआयने गुजरात टायटन्ससह १०० कोटींची डील केल्याचे सुद्धा सांगितले जात होते. या चर्चांदरम्यानच नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल खेळूच शकणार नाही अशा चर्चा होत्या मात्र आता सूत्रांच्या हवाल्याने समोर येणाऱ्या माहितीनुसार हार्दिक पंड्या आयपीएल खेळू शकेल असे दिसत आहे.
हार्दिक पंड्याचा आयपीएल रेकॉर्ड (Hardik Pandya IPL Records)
२०२२- २३ पासून गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांमध्ये, पंड्याने ३७. ८६ च्या सरासरीने आणि १३३ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ८३३ धावा केल्या, ज्यामध्ये सहा अर्धशतके आणि ८७ नाबादच्या सर्वोत्तम धावसंख्येसह विक्रमी खेळींचा समावेश आहे. त्याने संघासाठी ११ विकेटही घेतल्या.
हे ही वाचा<< “तीन महिन्यांपासून मी ब्लॉक..”, शिखर धवनने लेकाच्या वाढदिवशी पोस्ट लिहून चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी
तर पंड्याने २०१५ ते २०२१ दरम्यान एमआयसाठी ९२ सामने खेळले आहेत. १५३ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने २७. ३३ च्या सरासरीने १,४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतके समाविष्ट आहेत तसेच त्याने मुंबईसाठी ४२ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.