Hardik Pandya making fun of umpires video Viral: आशिया चषका २०२३ स्पर्धेत पावसाने वारंवार व्यत्यय आणला आहे. सोमवारी भारत आणि नेपाळ यांच्यातील आशिया चषकातील पाचव्या सामन्यात असेच दृश्य पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्याने नेपाळचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. नेपाळच्या डावा दरम्यान पावसामुळे सामना दोनदा थांबवण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चाहत्यांची निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला. हार्दिकचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कव्हर्स खेळपट्टीवर पोहोचोपर्यंत पाऊस थांबला-

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ३० वे षटक टाकल्यानंतर पावसाची हलकी रिमझिम सुरू झाली. खेळपट्टी खराब होऊ नये म्हणून मैदानावर लगेच कव्हर्स आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ काळ खेळ थांबवण्यात आला. मात्र, ते कव्हर्स खेळपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच पाऊस थांबला. यानंतर ते कव्हर्स परत बाहेक नेण्यात आले. मात्र तोपर्यंत भारतीय खेळाडूंनी मैदान सोडले नव्हते.

पंच रुचिराला हार्दिक पांड्याने मारली मिठी –

त्यानंतर रवींद्र जडेजा ३१वे षटक टाकायला सुरुवात करणार इतक्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. नेपाळचे फलंदाज डगआऊटच्या दिशेने जाऊ लागले, पण भारतीय खेळाडू तिथेच उभे राहिले. यावेळीही पाऊस काही काळ थांबला. हे पाहून हार्दिक जोरजोरात हसायला लागला आणि हात पायावर आपटायला सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकेच्या पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांच्याकडे जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली. किंबहुना, त्याने थोडक्‍यात स्टंप काढले, पण लगेचच पुन्हा जागेवर ठेवले. हार्दिक आणि पंच यांच्यातील या क्षणाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा – IND vs NEP: विराट कोहलीने नेपाळी गाण्यावर धरला ठेका, जबरदस्त डान्सचा VIDEO व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे, तर नेपाळने भारताला २३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला ४८.२ षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि २३० धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने ५८ आणि सोमपाल कामीने ४८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.