Hardik Pandya Photos with Russian Model Elena Tuteja: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात शानदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. पण गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे. हार्दिकने आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात काहीतरी बिनसलं असून घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. हा विषय अधिक चर्चेत आला टी-२० विश्वचषकानंतर, कारण नताशाने हार्दिकसाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही. मात्र, एका रशियन मॉडेलने हार्दिकसोबतचे फोटो शेअर करत वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चाहत्यांनी हार्दिक आता या मॉडेलला डेट करत आहे का असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव
भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर रशियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री अलिना टुटेजा हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने हार्दिक पंड्याबरोबरचे काही फोटो शेअर केली आहे. या दोघांनीही एका जाहिरातीच्या शूटसाठी हे फोटो काढले आहेत. इतकेच नाही तर अलिनाने हार्दिकसाठी खास कॅप्शनही दिले आहे.
अलिनाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारताला आपल्या चॅम्पियन्सचा खूप अभिमान वाटत आहे. या चॅम्पियन्सपैकी एका खेळाडूबरोबरचे काही फोटो शेअर करावेसे वाटले. संपूर्ण संघासह हार्दिक पंड्याचाही सर्वांना अभिमान आहे..’ या पोस्टवर भारतीय चाहते तिला हार्दिकची मैत्रिण म्हणू लागले. काहींनी हार्दिकबरोबर तिचे नावही जोडले. तर काही जण म्हणाले की हार्दिकबरोबरचा हा फोटो एडिट केलेला आहे. काही दिवसांनी ब्रायन लाराबरोबरही तिने फोटो शेअर केला आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले की, तिच्या कामामुळे तिला प्रसिद्ध लोकांना भेटण्याची संधी मिळते पण याचा अर्थ असा नाही की ती त्यांना डेट करत आहे.
हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
हेही वाचा – Euro Cup: नेदरलँड्सला हरवत इंग्लंडचा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश
हार्दिकबरोबर फोटो पोस्ट करणारी रशियन मॉडेल आहे तरी कोण? (Who is Elena Tuteja)
अलिना हीएक रशियन मॉडेल आहे, तिचा जन्म मॉस्कोमध्ये झाला आहे. काही वर्षांपूर्वी ती दिल्लीत आली आणि यानंतर ती मुंबईत गेली. तिने मिसेस इंडिया या स्पर्धेत भाग घेत तिसरा क्रमांक पटकावला. अलिना ही टिव्हीवरील मालिका पार्टनर्स, सावधान इंडिया आणि बदतमीज दिल या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. तिने दिल नावाच्या चित्रपटातही काम केले आहे.