हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील एक असा खेळाडू आहे, जो संघाबाहेर असला तरीही सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याची अनोखी जीवनशैली, त्याचे कपडे या गोष्टींमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. हार्दिकने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो त्याच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर हार्दिकने आपल्या नव्या हेअरस्टाईलचे दर्शन घडवले.

फोटोसाठी लिहिलेल्या कॅप्शनमध्ये हार्दिकने हेअरस्टईलिस्ट आलिम हकीमचे आभार मानले. आलिम हकीमे काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीची जबरदस्त हेअरस्टाईल केली होती. आता आयपीएल २०२१पूर्वी पंड्याने आपली हेअरस्टाईल निवडली आहे. हार्दिकची पत्नी नताशानेही नव्या हेअरस्टाईलवर दमदार प्रतिक्रिया दिली आहे.

 

Hardik Pandya posted his photo with new hair style
नताशाची कमेंट

 

हेही वाचा – IPL साठी दोन मातब्बर संघ यूएईला रवाना, धोनी दिसला ‘या’ अंदाजात

१९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात

४ मे रोजी भारतात बंद करण्यात आलेली आयपीएल आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये पुन्हा सुरू होत आहे. या लीगचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात हार्दिकवरही सर्वांच्या नजरा असतील. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात हार्दिकला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकपचा विचार करता आयपीएलच्या माध्यमातून हार्दिकला आपल्या फॉर्मात परतावे लागेल.

१७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजाहमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.

Story img Loader