करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

…आणि विराट लाईव्ह चॅटमध्येच बोलून गेला, “अरे, तू ‘ते’ व्हिडीओ बघ”

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधानता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सर्व क्रिकेटपटू लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत.

VIDEO : ‘शीला की जवानी’नंतर डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब भन्नाट डान्स

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्याशी सोशल मीडियावर लाईव्ह चॅट द्वारे संवाद साधला. त्यावेळी या तिघांनी विविध विषयांवर चर्चा केली. यातच बहुचर्चित कॉफी विथ करण चा विषय निघाला. त्यावर हार्दिकने मजेशीर उत्तर दिले. “हल्ली मी कॉफी पीत नाही. त्या ऐवजी मी ग्रीन टी पितो. कॉफी मी एकदाच प्यायली आणि ती एक कॉफी मला प्रचंड महाग पडली. इतकी महाग कॉफी स्टारबक्सचीही नसते. त्यामुळे त्या दिवसापासून मी कॉफीला परत हातही लावला नाही”, असे हार्दिकने उत्तर दिले.

IPL रद्द होण्याच्या बाबतदेखील या लाईव्ह चॅट दरम्यान चर्चा झाली. याबाबत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की जर यंदाचे IPL रद्द झालं तर एकाच कुटुंबात सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान तुमचं होईल. IPL झालं नाही, तर तुमच्या एवढा तोटा इतर कोणत्याही कुटुंबाचा होणार नाही.

“आमच्याकडून पैसे मागण्यापेक्षा दहशतवादावरचा खर्च बंद करा”

काय होतं हार्दिकचं ‘कॉफी विथ करण’ प्रकरण

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना करण जोहरने एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना या दोघांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या दोघांपुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली होती.

या प्रकरणात BCCI ने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. BCCI वर लोकपाल (ओमडसमन) नेमण्यात आला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी तात्पुरती मागे घेण्यात आली होती. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर या दोघांना १० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.

Story img Loader