वेस्ट इंडिजविरोधात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत विश्रांती मिळालेला हार्दिक पांड्याही या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. हार्दिक सध्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी नेट्समध्ये कसून सराव करतो आहे. आपल्या सरावसत्राचा व्हिडीओ हार्दिकने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

हार्दिकने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. यामध्ये आखुड टप्प्याच्या चेंडूवर उंच फटके खेळण्यापासून ते धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा सरावही हार्दिकने केला. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ…

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

Story img Loader