Hardik Pandya’s statement after winning the 3rd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या टी-२९ मालिकेत, अखेर टीम इंडियाला आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकला. १६० धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १७.५ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यातील विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानेही संघाच्या रणनीतीबद्दल खुलेपणाने सांगितले. त्याचवेळी त्यांनी निकोलस पूरन बाबतही या काळात प्रतिक्रिया दिली.
दोन पराभव किंवा दोन विजय दीर्घ योजना बदलत नाहीत –
तिसऱ्या सामन्यातील दणदणीत विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, “आम्ही एक संघ म्हणून बोललो की, पुढील तीन सामने रोमांचक होतील. दोन पराभव किंवा दोन विजय दीर्घकालीन योजना बदलत नाहीत. अशा सामन्यांना सामोरे जाताना आम्ही पूर्णपणे तयार आहोत हे दाखवावे लागेल.”
निकी हे ऐकेल –
तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याने वेगवान फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक निकोलस पूरनविरुद्धची रणनीती उघड केली. या सामन्यात पूरणला कुलदीप यादवने २० धावांवर बाद केले. हार्दिक म्हणाला, “तो फलंदाजीला जास्त येत नव्हता, म्हणून आम्ही आमच्या फिरकीपटूंचा त्याच्याविरुद्ध वापर केला. अक्षरला त्याची चार षटके टाकण्याचीही परवानगी होती. जर निकोलस पूरनला मारायचे असेल तर त्याला मला मारू द्या. ही माझी योजना होती आणि मी अशा स्पर्धेचा आनंद घेतो. मला माहित आहे की निकी (निकोलस पूरन) हे ऐकेल आणि चौथ्या टी-२० सामन्यात माझ्याविरुद्ध जोरदार फटकेबाजी करेल.”
सूर्याच्या जबाबदारीमुळे इतरांना संदेश मिळतो –
कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही सात फलंदाजांसह फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, जर फलंदाजांनी धावा केल्या तर तुम्हाला आठव्या क्रमांकावर कोणाची गरज नाही. सूर्याने सांगितल्याप्रमाणे ते आणि तिलक एकत्र खेळतात आणि एकत्र वेळ घालवतात. स्कायसारखे कोणीतरी संघात असणे चांगले आहे. जेव्हा तो जबाबदारी घेतो तेव्हा तो इतरांना संदेश देतो.”
हेही वाचा – महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : कोलंबियाची घोडदौड कायम; प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत
सामन्याबद्दल बोलायचे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२(४२) आणि रोव्हमन पॉवेलने ४०(१९) धावा केल्या. त्याच वेळी, अल्झारी जोसेफने गोलंदाजीत दोन बळी घेतले. त्याचवेळी भारताकडून प्रथम कुलदीप यादवने तीन बळी घेतले, त्यानंतर सूर्यकुमार यादवने ८३(४४) आणि तिलक वर्माने नाबाद ४९(३७) धावा करत संघाला विजय मिळवून दिला.