Hardik Pandya Health Update in Marathi: न्यूझीलंडला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचलेला भारतीय संघ सध्या वर्ल्डकप विजयासाठी फेव्हरेट मानला जात आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंतचे पाचही सामने भारतानं जिंकले आहेत. न्यूझीलंडचं आव्हान भारतासाठी कठीण मानलं जात होतं. मात्र, तो सामनाही भारतानं खिशात घातल्यामुळे वर्ल्डकप विजयाच्या आशा उंचावल्या असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. ती दुखापत अद्याप बरी झाली नसल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. त्याच्या समावेशामुळे जशी मधल्या फळीतील फलंदाजीला मजबुती आली, तशीच गोलंदाजीमध्येही अधिक धार आली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाच्या प्रवासात हार्दिक पांड्या महत्त्वाचा खेळाडू असून आता त्याच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. हार्दिक पांड्या आणखी किमान दोन सामने खेळू शकणार नसल्याची बाब समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Mohammed Shami Fitness Update BCCI Informs He Recovered From Injury But Not Fit for IND vs AUS Last 2 Matches
Mohammed Shami: मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला…, BCCI ने दिली मोठी अपडेट; ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? जाणून घ्या
Rohit Sharma and Akash Deep injured during practice sports news
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
Two persons standing at bus stop were injured in collision with motor vehicle in Worli on Sunday afternoon
वरळी येथे अपघात सहा जखमी
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
will Ravindra Chavan to be state president soon
भाजपचे धक्कातंत्र : रवींद्र चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी?

World Cup 2023 :मानसिकता, योजनेत बदलांची गरज! अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव पचवणे अवघड; बाबरची कबुली

इंग्लंड, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांना हार्दिक मुकणार!

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात घोट्याला दुखापत झाल्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर तो मैदानावर परतलाच नाही. या दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातूनही बाहेर पडावं लागलं. आता येत्या २९ ऑक्टोबर रोजीचा गतविजेत्या इंग्लंडविरुद्धचा सामना आणि त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना या दोन्ही सामन्यांना हार्दिक मुकणार आहे. त्यामुळे आता लीगमधल्या थेट शेवटच्या दोन सामन्यांसाठीच हार्दिक उपलब्ध होऊ शकेल अशी शक्यता आहे.

हार्दिकवर बंगळुरूमध्ये उपचार

दरम्यान, दुखापत झाल्यानंतर सध्या हार्दिक पांड्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. तो कोलकाता किंवा मुंबईतील सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये परतेल, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Team India: BCCIने वर्ल्ड कपच्या मध्यावर टीम इंडियाबाबत घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टींवर घातली बंदी

“टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापच झाली आहे. त्याला डॉक्टरांनी उपचारांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे”, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

Story img Loader