यूएईमध्ये होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. भारताचे खेळाडूदेखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहेत. भारताने पाकिस्तानविरोधाील आपला पहिलाच सामना पाच गडी राखून जिंकला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने धडाकेबाज कामगिरी केली. त्याने फलंदाजी तसेच गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चांगला खेळ करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, या नेत्रदीपक कामगिरीनंतर हार्दिक पंड्याने त्याच्या यशामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022, INDvsHK Live Updates : हाँगकाँगने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय, काही क्षणांत सामन्याला सुरुवात

माझ्या चांगल्या कामगिरीमागे महेंद्रसिंह धोनीचा सिंहाचा वाटा आहे, असे हार्दिक पंड्या म्हणाला आहे. “मी त्यावेळी अगदीच नवखा होतो. मी तेव्हा जगणं तसेच खेळ शिकत होतो. माझ्या प्रगतीमागे महेंद्रसिंह धोनीचा सिंहाचा वाटा आहे. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा-तेव्हा मी धोनीच्या खेळाचे निरीक्षण करत राहिलो. त्याच्या खेळाचे निरीक्षण करत मी शिकत राहिलो. धोनीचा खेळाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे, त्याचा मी अभ्यास करत राहिलो. जेव्हा मी मैदानावर असतो तेव्हा त्याचेच प्रतिबिंब उमटते,” असे हार्दिक पंड्या म्हणाला.

हेही वाचा >> क्रिकेटचा देव पुन्हा एकदा बॅट हातात घेणार, सचिन तेंडुलकर ‘या’ क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता

दरम्यान, हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरोधातील सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली. त्याने गोलंदाजी विभागात पाकिस्तानचे तीन गडी बाद केले. तसेच फलंदाजीमध्ये १७ चेंडूमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या. पहिल्या फळीतील विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताची परिस्थिती बिकट झाली होती. अशा वेळी जडेजा आणि पंड्या या जोडीने संयमी खेळ करत भाराताला विजयापर्यंत नेलं. पांड्या शेवटपर्यंत नाबाद राहिला.

Story img Loader