Hardik Pandya Salary In IPL 10 Years: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स (GT) कडून ऑल-कॅश ट्रेडद्वारे व्यवहार झाल्यानंतर आता त्याच्या जुन्याफ्रेंचायझी मुंबई इंडियन्स (MI) मध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्यासाठी गुजरात टायटन्सला १५ कोटी दिल्याचे समजतेय. प्राप्त माहितीनुसार यापूर्वी पांड्याने सात आयपीएल हंगामांसाठी मुंबई इंडियन्ससोबत करार केला होता, २०२२ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले होते. गुजरात टायटन्सचे त्यांच्या पदार्पणाच्या वर्षातच पांड्याकडे नेतृत्वाची संधी सोपवली होती. गुजरात टायटन्सच्या निर्मितीपासून एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळवून दिल्यावर पंड्याला रिलीज करण्यात आले आहे. आयपीएलच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत हार्दिक पंड्याच्या खेळाडू ते कर्णधार भूमिकेसह त्याचा पगार सुद्धा वाढला आहे.

मुंबई इंडियन्सने २०१५ च्या लिलावात १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत पंड्याला संघात समाविष्ट केले होते. तेथून पुढे, एमआयसाठी सुवर्णकाळात हार्दिक पंड्याची रँक सुद्धा वाढत गेली. सहा वर्षांच्या कालावधीत मुंबईच्या चार विजेतेपदांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या पंड्याने मागे वळून पाहिलेलं नाही.

पहिल्या दोन हंगामात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरल्यानंतर, पंड्या अखेरीस २०१७ मध्ये त्याच्या महत्त्वपूर्ण खेळींसह प्रसिद्धीच्या झोतात आला. याच हंगामात ३५.७१ च्या सरासरीने आणि १५६.२५ च्या स्ट्राइक रेटने त्याने २५० धावा केल्या. त्याने हंगामात ६ विकेट्स सुद्धा घेतल्या होत्या ज्यामुळे MI ने त्याला २०१८ च्या मेगा लिलावापूर्वी ११ कोटींच्या किमतीत रिटेन केले. पंड्याने २०१८ आणि २०१९ मध्ये त्याच्या यशस्वी हंगामात अनुक्रमे २६० आणि ४०२ धावा केल्या. त्याने दोन मोसमात ३२ विकेट्स देखील मिळवल्या ज्यामुळे संपूर्ण अष्टपैलू म्हणून त्याचा दबदबा तयार झाला.

तीन सीझनसाठी राखून ठेवल्यानंतर, पंड्याला मुंबई इंडियन्सद्वारे २०२१ च्या आवृत्तीपूर्वी रिलीझ केले गेले परंतु फ्रँचायझीने त्याला पुन्हा एकदा ११ कोटी रुपयांना विकत घेतले. तथापि, या अष्टपैलू खेळाडूला २०२१ मध्ये हवे तसे यश हाती आले नाही १२ सामन्यांत केवळ १२७ धावा करणाऱ्या पंड्याला, २०२२ मध्ये मेगा लिलावापूर्वी पुन्हा एकदा MI द्वारे रिलीज केले गेले पण यामुळेच पंड्याचे नशीब बदलले.

IPL मध्ये दहा वर्षात हार्दिक पंड्याचा पगार किती बदलला?

वर्ष कमाई 
201510 लाख
201610 लाख
201710 लाख
201811 कोटी
201911 कोटी
202011 कोटी
202111 कोटी
202215 कोटी
202315 कोटी
202415 कोटी

हे ही वाचा<< “हार्दिक पांड्या MI चा नवा कर्णधार होऊन, रोहितला..”, भारतीय माजी सलामीवीराचं बोल्ड विधान, म्हणाला, “धोनी सारखं..”

नव्याने स्थापन झालेल्या IPL फ्रँचायझी गुजरात टायटन्सने 15 कोटींमध्ये त्यांचा कर्णधार म्हणून पंड्याला संघात स्थान दिले. पंड्याने गुजरातला त्यांच्या पदार्पणाच्या मोसमात आयपीएल जेतेपद मिळवून दिले. त्याने 15 सामन्यांत (त्याच्या संघासाठी सर्वाधिक) ४८७ धावा केल्या. तर २७. ७५ च्या सरासरीने आणि ७.२८ च्या इकॉनॉमीने त्याने आठ विकेट्स घेतल्या आणि आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या मोसमात ट्रॉफी जिंकणारा पंड्या दुसरा कर्णधार ठरला. आता मुंबई इंडियन्सकडे परतल्यावर रोहित शर्माचे कर्णधारपद पंड्याकडे सोपवले जाणार असल्याची सुद्धा चर्चा आहे.

Story img Loader