Hardik Pandya says I have to work twice or thrice as hard: भारत आणि पाकिस्तान संघांत रविवारी आशिया चषक २०२३ मधील सुपर फोर फेरीतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा उपकर्णधार हार्दिक पाड्या म्हणतो की, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्यावर कामाचा ताण स्पेशालिस्ट फलंदाज किंवा गोलंदाजापेक्षा २-३ पट जास्त असतो.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, “अष्टपैलू म्हणून माझ्यावर कामाचा भार इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट आहे. जेव्हा संघातील फलंदाज जाऊन फलंदाजी करतो आणि आपली फलंदाजी संपवून घरी जात असतो, तेव्हाही मी गोलंदाजी करायची असते. म्हणून माझ्यासाठी, सर्व व्यवस्थापन, सर्व दबाव, आणि सर्वकाही सत्र किंवा माझे प्रशिक्षण किंवा माझ्या शिबिरपूर्व हंगामात घडते.”
२०१९ मध्ये हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. बडोद्याच्या या खेळाडूला टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्या खेळात बरीच सुधारणा झाली असून तो पुन्हा वेगवान गोलंदाजी करत आहे. मात्र, हार्दिक त्याच्या गोलंदाजीबाबत खूप सावध आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या साखळी सामन्यात पांड्याने ८७ धावांची खेळी खेळली आणि भारतीय संघाला २६६ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला.
हेही वाचा – Team India: विराट कोहलीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळतानाचा VIDEO व्हायरल
भारतीय एकदिवसीय संघाच्या उपकर्णधाराने असेही सांगितले की, तो सामन्याची परिस्थिती समजून घेतो आणि त्यानंतरच त्याला पूर्ण १० षटके टाकायची आहेत की नाही ते ठरवतो. तो म्हणाला,”जेव्हा सामन्याची वेळ येते, तेव्हा संघाला कशाची गरज असते आणि (वर्कलोड) व्यवस्थापन यातून बाहेर पडते आणि मला किती षटके टाकायची हे ठरते.”
हेही वाचा – Asia Cup 2023: “माझा विश्वास आहे की, फक्त…”; IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार बाबर आझमचे मोठं वक्तव्य
तुम्ही स्वतःला आधार दिला पाहिजे –
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “कारण जर १० षटकांची गरज नसेल, तर मी १० षटके टाकण्यात काही अर्थ नाही. पण जर १० षटकांची गरज असेल, तर मी गोलंदाजी करेन. माझा नेहमीच विश्वास आहे की मी खेळाचा अभ्यास करून आणि स्वतःला पाठिंबा देऊन यशस्वी होण्याची संधी देतो.” उपकर्णधार पुढे म्हणाला, “मला हे समजले आहे की काहीही झाले तरी तुम्ही स्वतःला आधार दिला पाहिजे. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही जगातील सर्वोत्तम आहात. हे तुम्हाला यशाची हमी देत नाही, परंतु ते तुम्हाला यशाच्या दिशेने कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करते, म्हणून स्वतःला व्यावहारिकरित्या पाठिंबा दर्शवला पाहिजे.”