India vs West Indies 1st T20 Updates: भारत आणि वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला ९ बाद १४५ धावा करता आल्या. टीम इंडिया एकेकाळी खूप चांगल्या प्रकारे लक्ष्याचा पाठलाग करत होती, मात्र अचानक झटपट विकेट्स गमावल्यामुळे टीमची सामन्यातील पकडच ढिली झाली. या पराभवाने निराश झालेल्या भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने धडा घेण्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही टी-२० सामन्यात सतत विकेट गमावता तेव्हा असे दडपण असते. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही खूप आरामात दिसत होतो, पण सामन्याच्या मध्यभागी आम्ही काही मोठ्या चुका केल्या, ज्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. टी-२० क्रिकेटमध्ये, जेव्हाही तुम्ही तुमच्या डावात सतत विकेट गमावता तेव्हा कोणतेही लक्ष्य गाठणे खूप कठीण होऊन बसते आणि आज आमच्यासोबत तेच घडले. दोन मोठे फटके टी-२० क्रिकेटमधील संपूर्ण खेळ बदलू शकतात. डावाच्या मध्यभागी आम्ही २ विकेट गमावल्या असताना आमची लय बिघडली आणि लक्ष्याचा पाठलाग पूर्ण होऊ शकला नाही.’

म्हणून तीन फिरकीपटूंना संधी दिली होती –

कर्णधार हार्दिक पांड्याने पहिल्या टी-२० सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंना संधी दिली होती. ज्यामध्ये अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या तिघांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होता. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले की, ‘तीन फिरकीपटूंना खेळवण्यााचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात आला होता. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंना येत्या सामन्यांमध्ये एकत्र खेळण्याची संधी देऊ इच्छितो. अक्षर पटेल आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगले संतुलन देतो.’

हेही वाचा – IND vs WI 1st T20: रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा ४ धावांनी विजय, भारतीय फलंदाजांची लज्जास्पद कामगिरी

तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली –

कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, ‘तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. मुकेश कुमारने तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुकेश कुमारने शेवटची दोन चांगली षटके टाकली, ही चांगली गोष्ट आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये दोन आठवडे घालवले आहेत आणि खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. त्याला संघासाठी योगदान द्यायचे आहे. तिलक वर्माने ज्या पद्धतीने डावाची सुरुवात केली ते पाहून खूप आनंद झाला. तुमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात षटकाराने करणे हा वाईट मार्ग नाही. तिलक वर्माकडे आत्मविश्वास आणि निर्भयता आहे. तो भारतासाठी चमत्कार घडवणार आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya says whenever you keep losing wickets it becomes very difficult to achieve any target vbm