Hardik Pandya Gym Video Viral : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर असलेला हा खेळाडू जिममध्ये घाम गाळताना दिसला. हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचा व्हिडीओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गतवर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियापासून दूर आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही जाऊ शकला नाही. याशिवाय अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आलेली नाही.

वास्तविक, हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “उष्णता वाढवत आहे.” या व्हिडीओवरून असे समजले जाते की हार्दिक पुनरागमन करण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत घेत आहे आणि त्याला स्वतःही लवकरच पुनरागमन करायचे आहे.

हेही वाचा – IND vs AFG : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला संघाबाहेर

हार्दिकच्या या व्हिडिओवर चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहते हार्दिकच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर काही लोक आपला राग हार्दिकवर काढत आहेत. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही चाहत्यांनी सांगितले की त्याला आयपीएलसाठी तंदुरुस्त व्हावे लागेल, तर काहींचे म्हणणे आहे की २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिक पंड्या पुन्हा दुखापतग्रस्त होईल.

हेही वाचा – Virender Singh : “माझा गुन्हा एवढाच आहे की मी…”, पुरस्कार न मिळाल्याने मूक-बधिर पैलवानाने शेअर केली भावनिक पोस्ट

हार्दिकच्या अनुपस्थितीत रोहितला टी-२० संघाची कमान मिळाली –

हार्दिक पंड्या अनफिट असल्यामुळे रोहित शर्माकडे अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० टीमची कमान देण्यात आली. रोहित शर्मासोबत विराट कोहलीही १४ महिन्यांनंतर टी-२० संघाचा भाग आहे. या दोन्ही खेळाडूंनी शेवटचा सामना २०२२ च्या टी२० विश्वचषकात खेळला होता

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya shared the video from the gym and captioned it turning up the heat vbm