भारत वि इंग्लंड चौथ्या टी-२० सामन्यात भारताच्या दोन अष्टपैलू खेळाडूंनी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोठी भूमिका बजावली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८१ धावा केल्या आहेत. भारतीय संघ ३ बाद १२ धावांवर असतानाही संघाने चांगली धावसंख्या उभारली. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या दोघांनी अर्धशतकं झळकावली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साकिब महमूदच्या गोलंदाजीवर भारताने दुसऱ्याच षटकात ३ विकेट्स गमावले. भारताचे टॉप-३ फलंदाज एका झटक्यात बाद झाले होते. यानंतर रिंकूने संघाचा डाव उचलून धरला पण तो बाद झाल्यानंतर भारताला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी चांगल्या भागीदारीची गरज होती. पंड्या आणि दुबेने ८७ धावांची भागीदारी रचत आपापली अर्धशतकं देखील पूर्ण केली.

हार्दिक पंड्याने अर्धशतकासह घेतला बदला

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मध्ये हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी खेळली. टीम इंडिया अडचणीत असताना त्याच्या बॅटमधून ही तुफान खेळी पाहायला मिळाली. पंड्याने क्रीजवर येताच तुफानी फटके खेळले आणि अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. या खेळीसह हार्दिकने राजकोटमधील खेळीनंतर केलेल्याचा बदला घेतला.

राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये हार्दिक पंड्याने ४० धावा केल्या, पण त्याने ३५ चेंडू खेळले. त्याचा स्ट्राइक रेट १२० पेक्षा कमी होता. मोठी गोष्ट म्हणजे त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये ध्रुव जुरेलला स्ट्राईकही दिला नाही आणि त्यानंतर तो स्वतः बाद झाला. हार्दिकच्या या खेळीनंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर चौथ्या टी-२० मध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिकने महमूदच्या गोलंदाजीवर दोन दणदणीत षटकार लगावत त्याच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली.

शिवम दुबेचं अर्धशतकासह दणक्यात पुनरागमन

शिवम दुबेने चौथ्या टी-२० सामन्यात ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्यासोबत ४५ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. शिवम दुबेला सुरूवातीला टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही, परंतु नितीश रेड्डीच्या दुखापतीनंतर हा खेळाडू दुसऱ्या टी-२० साठी टीम इंडियामध्ये सामील झाला. दुबेला तिसऱ्या टी-२० मध्ये बेंचवर ठेवण्यात आले होते पण चौथ्या टी-२० मध्ये त्याला संघात सामील केलं आणि त्याने स्वताला सिद्ध केलं.

T20I मध्ये भारतासाठी सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

९१ सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल, वि. श्रीलंका पुणे २०२३
८७ शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या, वि. इंग्लंड पुणे २०२५
७० विराट कोहली आणि हार्दिक पंड्या वि. इंग्लंड अहमदाबाद २०२१

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya shivam dube partnership record with fifty for 6th wicket ind vs eng 4th t20i bdg