Fans criticize Hardik Pandya for missing Tilak Verma fifty: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमानांना ७ गडी राखून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्यापासून रोखले. गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला १६० धावांचे लक्ष्य मिळाले, जे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर त्यांनी १७.५ षटकांत सहज गाठले. मात्र, या सामन्यातील विजयानंतरही भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका कृत्यामुळे चाहते संतापले असून त्याला स्वार्थी खेळाडू म्हणत ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिलक वर्माला आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करू न दिल्यामुळे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या चाहत्यांच्या रोषाचा बळी ठरत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ८३ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी फक्त २ धावांची गरज असताना, कर्णधार हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा ४९ धावा करून नाबाद खेळत होता.

त्यावेळी हार्दिक पांड्याने रोव्हमन पॉवेलच्या चेंडूवर षटकार ठोकला. यामुळे भारतीय संघाला विजय मिळाला, मात्र तिलक वर्माला आपले दुसरे आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण करता आले नाही. टीम इंडियाने १३ चेंडू राखून सामना जिंकला. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या या कृतीबद्दल चाहते सोशल मीडियावर सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर तो स्वार्थी कर्णधार असल्याची टीकाही करत आहेत. तसेच हे खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हणत आहेत.

हेही वाचा – IND vs WI T20:कुलदीप यादवने चहल-हसरंगाला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथाच गोलंदाज

चाहत्यांना आली महेंद्रसिंह धोनीची आठवण –

हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच त्याला एमएस धोनीची सर येणार नाही, असे म्हणत आहेत. यासोबतच माजी कर्णधार एमएस धोनीचा एक जुना व्हिडिओ देखील यावेळी व्हायरल होत आहे, जो जुन्या सामन्यातील आहे. हा व्हिडीओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि विराट कोहली फलंदाजी करताना दिसत आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी ७ चेंडूत १ धावांची गरज होती आणि धोनी स्ट्राइकवर होता. धोनीने ४९व्या षटकाचा शेवटचा चेंडू डॉट खेळला आणि ६८ धावांवर फलंदाजी करणाऱ्या कोहलीला स्ट्राइक दिली. धोनीच्या या खेळाच्या भावनेने चाहत्यांची मने जिंकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya trolled by fans after missing tilak vermas half century ind vs wi 3rd t20 vbm