Hardik Pandya Viral Video of Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील मोठमोठे कलाकार पोहोचले आहेत. त्याप्रमाणे भारतीय क्रिकेटपटूही पोहोचले होते. याच लग्नसोहळ्यातील अनेक विविध फोटो, व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यादरम्यानचा भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान तो लग्नसोहळ्यात टकिलाची ऑर्डर देतानाचा त्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

हार्दिक पंड्या विविध सेलिब्रिटींसह तिथे उभा होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी देखील आहेत. यामध्ये रणबीर कपूरपासून ते अर्जुन कपूर आणि कतरिना कैफ तर सुप्रसिध्द अभिनेता महेश बाबू आणि त्याचे कुटुंबीयही आहेत. हे सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत भेटताना दिसत आहेत. यादरम्यान हार्दिक आणि शिखर पहारियाचा भाऊ हातवारे करून ड्रिंक मागत होते. त्यानंतर वेटर त्यांच्या जवळ येताच हार्दिकने टकिला टकिला, दोन टकिला अशी ऑर्डर दिली. या व्हीडिओमध्ये हार्दिकचा आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे.

हेही वाचा – James Andersonने अखेरच्या सामन्यात केला विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

अलीकडेच, टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात पंड्याची येथे कामगिरी वाखाणण्याजोगी होती. हार्दिकने संपूर्ण हंगामात बॅट आणि बॉल दोन्हीसह चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. फलंदाजी करताना पंड्याने एकूण ६ डावांमध्ये एका अर्धशतकासह १४४ धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याला ८ डावांत ११ विकेट मिळवले. अंतिम सामन्यात २० धावा देत ३ विकेट ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी संख्या होती.

विश्वचषक २०२४ सुरू होण्यापूर्वीचे सहा महिने हार्दिकसाठी खूपच अवघड होते. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून निवड केली, हा निर्णय चाहत्यांना अजिबातचं आवडला नाही. आयपीएलमध्ये वानखेडेवर खेळताना पंड्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चाहते भर स्टेडियमध्ये हार्दिकची हुर्याे उडवत होते. पण हार्दिकच्या उत्कृष्ट टी-२० विश्वचषक मोहिमेनंतर परिस्थिती बदलली.

Story img Loader