Natasha Post After Hardik Pandya: टी २० विश्वचषक जिंकल्यावर भारतीय चाहत्यांचं व खेळाडूंचं सेलिब्रेशन तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, सूर्या यांनी आपापल्या कुटुंबासह मैदानात व सोशल मीडियावर हा आनंद साजरा केला. पण या सगळ्यात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ओव्हर टाकणारा हार्दिक पंड्या मात्र अनेक फोटो व व्हिडीओज मध्ये एकटाच दिसत आहे. अर्थात कोट्यवधी भारतीय चाहत्यांची साथ व प्रेम त्याच्या जोडीला आहेच पण हार्दिकची बेटर हाफ म्हणजेच नताशा स्टॅनकोव्हिक हिने या विश्वचषक विजयावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. नताशा टी २० विश्वचषकासाठी बार्बाडोसमध्ये गेली तर नव्हतीच पण विजयानंतर तिने एकही पोस्ट किंवा स्टोरी सुद्धा शेअर केलेली नाही. हा पंड्या कुटुंबाचा खासगी प्रश्न असला तरी चाहत्यांना या प्रकारामुळे अनेक प्रश्न पडले आहेत. हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुद्धा यामुळे उधाण आले आहे. या दरम्यान आज नताशाने पोस्ट केलेल्या रीलमधील एक मजकूर आणखीनच भुवया उंचावणारा आहे. नेमकी ही चर्चा कशाची होतेय, चला पाहूया..

तुम्हाला माहित असेलच की आज, ४ जुलै हार्दिक पंड्या सुद्धा टीम इंडियाच्या खेळाडूंसह मायदेशी परतला आहे. सर्वात आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर संपूर्ण टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. संध्याकाळी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वरून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली निघणार आहे. अशातच आज नताशाने रील पोस्ट करून देवाकडे प्रार्थना केली आहे. देवा मी जेव्हा संकटात असते तेव्हा मला त्यातून बाहेर काढ आणि जेव्हा संकटात नसते तेव्हा माझं रक्षण कर अशा आशयाची ही रील आहे. ही प्रार्थना चांगल्यासाठीच केली असली तरी तिचा आता या क्षणी संदर्भ काय असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप

अगदी काहीच दिवसांपूर्वी नताशानी बायबलमधील एक वाक्य वाचतानाचा स्वतःचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता. “मी आज एक अशी गोष्ट वाचली की ज्याची मला खरोखरच गरज होती. म्हणूनच हे बायबल मी माझ्याबरोबर कारमध्ये घेऊन आले जेणेकरून मला ते तुम्हाला सगळ्यांना वाचून ऐकवता येईल. तर हे वाक्य असं होतं की. ‘तुमच्याआधी, तुमच्यानंतर व तुमच्या बरोबर देवच कायम असणार आहे. तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही किंवा दूर करणार नाही. म्हणूनच तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. आपण एखाद्या परिस्थितीत जेव्हा अडकून पडतो तेव्हा आपलं सगळं अवसान गाळून जातं, निराशा जाणवते, दुःख वाटून आपण सगळं काही गमावून बसलोय असं वाटतं, पण तेव्हा सुद्धा देव तुमच्याबरोबरच असतो. तुमच्याबाबत वाईट जरी घडत असलं तरी देवाकडे तुमच्यासाठी चांगलं घडण्याचे प्लॅन्स सुद्धा तयार असतात.”

हे ही वाचा<< रोहित, कोहली, बुमराह, द्रविडने १६ तासांच्या प्रवासात केलं काय? एकत्र प्रवास केलेल्या प्रतिनिधींनी शेअर केलेला खास अनुभव वाचा

नताशाच्या या प्रेरणादायी पण दुःखी पोस्टचा संबंध अनेकजण तिच्या व आणि हार्दिक पांड्याच्या नात्यात आलेल्या कटुतेशी जोडत आहेत. आयपीएलच्या दरम्यान नताशाने आपले लग्नाचे फोटो डिलीट केले होते. यातूनच घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. काही दिवसांनी नताशाने ते फोटो रिस्टोअर केले तेव्हा लोकांनी असे कयास बांधले की, कदाचित आयपीएलच्या वेळी होत असलेलं ट्रोलिंग थांबवण्यासाठी व हार्दिकला सहानुभूती मिळवून देण्यासाठी तिने आधी फोटो डिलीट केले असावेत. पण आता पुन्हा टी २० विश्वचषकनंतर पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे. या जोडप्याने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

Story img Loader