Natasha Post After Hardik Pandya: टी २० विश्वचषक जिंकल्यावर भारतीय चाहत्यांचं व खेळाडूंचं सेलिब्रेशन तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, सूर्या यांनी आपापल्या कुटुंबासह मैदानात व सोशल मीडियावर हा आनंद साजरा केला. पण या सगळ्यात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ओव्हर टाकणारा हार्दिक पंड्या मात्र अनेक फोटो व व्हिडीओज मध्ये एकटाच दिसत आहे. अर्थात कोट्यवधी भारतीय चाहत्यांची साथ व प्रेम त्याच्या जोडीला आहेच पण हार्दिकची बेटर हाफ म्हणजेच नताशा स्टॅनकोव्हिक हिने या विश्वचषक विजयावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. नताशा टी २० विश्वचषकासाठी बार्बाडोसमध्ये गेली तर नव्हतीच पण विजयानंतर तिने एकही पोस्ट किंवा स्टोरी सुद्धा शेअर केलेली नाही. हा पंड्या कुटुंबाचा खासगी प्रश्न असला तरी चाहत्यांना या प्रकारामुळे अनेक प्रश्न पडले आहेत. हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुद्धा यामुळे उधाण आले आहे. या दरम्यान आज नताशाने पोस्ट केलेल्या रीलमधील एक मजकूर आणखीनच भुवया उंचावणारा आहे. नेमकी ही चर्चा कशाची होतेय, चला पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा