Hardik Pandya Natasa Stankovic: गेल्या काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. या घटस्फोट प्रकरणाबाबच दोघांनीही कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरी त्यांच्या शांत राहण्याने चर्चांना आणखीच खतपाणी घातले आहे. यादरम्यान नताशा इन्स्टाग्रामवर सतत अनेक अपडेट्स शेअर करत होती आणि त्यावरून या दोघांमध्ये काही ना काही नक्कीच बिनसलं असल्याचे दिसून येत होते. पण आता नताशाच्या इन्स्टाग्रामवरून असे काही अपडेट समोर आले आहेत. ज्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक पंड्या सध्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत न्यूयॉर्कमध्ये आहे, तर नताशा भारतातच आहे. आता नतासा स्टॅनकोविकने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हार्दिकसोबतचे तिचे सर्व फोटो रिस्टोर केले आहेत. ज्यात व्हॅलेंटाईन डे आणि त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांच्या फोटोंचा समावेश आहे. नताशाने अचानक फोटो रिस्टोर केल्याने चाहत्यांमध्ये आता वेगळीच चर्चा सुरू आहे. हार्दिक नताशाचा घटस्फोट होणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

नताशाने सुरूवातीला हार्दिकबरोबरचे फोटो आणि आडनाव हटवल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने त्याचा मुलगा आणि हार्दिक नताशाचा मुलगा अगस्त्यसोबत खेळतानाचा एक गोड फोटो शेअर केला होता. त्यावर नताशाने हार्ट इमोजीसह कमेंटही केली होती. तर हार्दिक पंड्या आयपीएलनंतर भारतात नसून एकटाच अज्ञात स्थळी फिरायला गेल्याचे वृत्त समोर आले होते. तर नताशा आणि अगस्त्य भारतातच होते. नताशा आणि हार्दिकमध्ये सध्या बिनसलेलं असतानाही त्यांचा मुलगा अगस्त्य हा कृणाल पंड्या आणि पंखुरीसोबत होता, ज्याचे फोटो-व्हीडिओ वेळोवेळी पाहायला मिळाले.

हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यामुळे क्रिकेटपटूचे चाहते त्याची पत्नी नताशावर फसवणूक केल्याचा आरोप करत होते. दरम्यान, नताशा स्टॅनकोविकचे नाव अलेक्झांडर ॲलेक्ससोबतही जोडले जात होते. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्याची बातमी समोर आल्यानंतर नताशा अलेक्झांडर ॲलेक्ससोबत अनेकदा दिसली. या दोघांचा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya wife natasa stankovic restored wedding and valentine photos with cricketer bdg