BCCI on Hardik Pandya: हार्दिक पंड्या क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार? हा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू पंड्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये पुनरागमन करू शकतात, असे बीसीसीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक नुकताच गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३च्या विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो परत विश्वचषक खेळू शकला नाही. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, हार्दिक पंड्या पुढील १८ आठवडे संघाबाहेर राहणार आहे. हार्दिकची दुखापत लवकरात लवकर बरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) यांनी १८ आठवड्यांची विशेष योजना तयार केली आहे.

हेही वाचा: Ajay Jadeja: “इथे रिजेक्शन आहे, सिलेक्शन…”, भारतीय क्रिकेट निवड समितीच्या कारभारावर अजय जडेजा भडकला

२०२४ ते २०२६ दरम्यान हार्दिक पंड्याने तंदुरस्त राहावे यासाठी बीसीसीआयने ‘हाय परफॉर्मन्स प्रोग्राम’ नावाची योजना आखली आहे. ‘न्यूज १८’ मधील वृत्तानुसार, बीसीसीआय आणि एनसीएने हार्दिकसाठी १८ आठवड्यांची योजना तयार केली आहे, ज्यामध्ये मार्चपर्यंत त्याचे दररोज मूल्यांकन केले जाईल. पंड्यासाठी १८ आठवड्यांसाठीचा बीसीसीआय आणि एनसीएने कार्यक्रम तयार केला आहे. त्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, कार्डिओ आणि पुरेशी विश्रांती या तंदुरुस्तीच्या विविध घटकांचा समावेश केला आहे.

२०२३च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. टीम इंडियाने विश्वचषकातील चौथा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर हार्दिक मैदानाबाहेर गेला होता, त्यानंतर तो अद्याप परतला नाही.

हेही वाचा: आर्चरला IPL २०२४मध्ये खेळणे कठीण, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव टी-२० कर्णधार झाला

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने २०२३ मध्ये एकही टी-२० सामन्याचे नेतृत्व केले नाही. एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या पहिल्या वर्षी (२०२३) खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याने संघाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर हार्दिकच्या दुखापतीनंतर बीसीसीआयने फॉरमॅटचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवले.

‘द मेन इन ब्लू’ने विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली, ज्याद्वारे सूर्यकुमार यादवने प्रथमच भारताची जबाबदारी स्वीकारली आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने ही मालिका ४-१ने जिंकली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळलेल्या टी-२० मालिकेतही त्याला कर्णधार बनवण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya will not return to team india for 18 weeks bcci and nca prepared special program avw