Hardik Pandya Natasha Separation : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आणि नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात ज्याने महत्त्वाची भूमिका बजावली त्या हार्दिक पंड्याने पत्नी नताशापासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून त्याने ही माहिती दिली. तसेच मुलाच्या संगोपनासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध असू असंही हार्दिकने म्हटलं आहे. हे वर्ष हार्दिक पंड्यासाठी अतिशय वादळी ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुजरात टायटन्स संघातून तो मुंबई इंडियन्समध्ये कर्णधार म्हणून परतला. त्यानंतर आयपीएलमध्ये सुमार कामगिरी आणि चाहत्यांकडून झालेल्या ट्रोलिंगचा आणि खासगी आयुष्यात कौटुंबिक समस्याचा सामना त्याने केला होता. या संकटावर मात करत विश्वचषकात त्याने बहारदार कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिक पंड्या आपले अश्रू रोखू शकला नाही. त्याचा अश्रू ढाळतानाचा चेहरा अनेकांना भावनिक करणारा होता. हार्दिक आणि नताशाने आता लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी संयुक्त पत्रक काढले. आम्ही नाते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हाला वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे.

हे वाचा >> हार्दिक पंड्या: दुखापत, ट्रेडऑफ, ट्रोलिंग, वर्ल्डकपविजेता, कर्णधारपद नाही, घटस्फोट- सहा नाट्यमय महिन्यांची सफर

हार्दिक आणि नताशाने त्यांच्या तीन वर्षांच्या अगस्त्यच्या पालकत्वाबाबतही भाष्य केले. वेगळे होत असलो तरी अगस्त्यचे पालकत्व दोघांकडेही राहणार आहे.

मला रडायचे होते, पण रडलो नाही

हार्दिक आणि नताशाने विभक्त होण्याची घोषणा करताच हार्दिकचे टी-२० विश्वचषक विजयानंतर केलेले भाषण व्हायरल होत आहे. विजयाचा आनंद साजरा करत असताना हार्दिकने आपले अश्रू रोखत संवाद साधला होता. मागचे सहा महिने खूप कठीण होते, असे हार्दिक सांगतो. माझी टिंगल टवाळी करण्यात आली, मी मैदानात उतरल्यानंतर शेरेबाजी करण्यात येत होती. मात्र मी शांत राहिलो. मी काहीच व्यक्त झालो नाही. जेव्हा मला रडायचे होते, तेव्हाही मी रडलो नाही. कारण मी व्यक्त झालो असतो तर माझ्यावर शेरेबाजी करणाऱ्यांना आणखी आनंद वाटला असता. मला त्यांना आनंद द्यायचा नव्हता.

हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० ला लग्नगाठ बांधली होती. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र त्यांनतर वर्षभरातच पंड्या कुटुंबात काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत. मात्र त्यावेळेस सुद्धा नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यादरम्यान तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या नावातून पंड्या हे आडनाव सुद्धा काढून टाकले होते. काही दिवसांनी नताशाने लग्नाचे फोटो इन्स्टा अकाउंटवरून डिलीट केले होते.

हे ही वाचा >> Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: घटस्फोटानंतर काय असणार नताशा स्टॅनकोविकचा उत्पन्नाचा स्त्रोत? जाणून घ्या

पण त्यानंतर पुन्हा टी २० विश्वचषकाच्यावेळी नताशाने हार्दिकच्या यशातही अजिबात सहभाग घेतला नाही. तिने एकदाही हार्दिकला अभिनंदन करणारी किंवा त्याचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली नव्हती. हार्दिकने सुद्धा मुंबईत परतल्यावर केवळ आपला मुलगा अगस्त्यसह सेलिब्रेशन करून फोटो शेअर केले होते पण त्यातही नताशा दिसली नव्हती.