Irfan Pathan on Hardik Pandya vice captaincy : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखील १५ सदस्सीय संघ ३० एप्रिल रोजी जाही केला आहे.जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बनवण्यात आले आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवल्यानंतर माजी अष्टपैलू इरफान पठाणने प्रश्न उपस्थित केला आहे. इरफान पठाणच्या मते, जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या उपकर्णधाराची भूमिका बजावण्यास अधिक सक्षम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दुखापत हा नक्कीच एक पैलू आहे, पण योग्य नियोजन…’

वास्तविक, इरफान पठाण आयपीएलच्या अधिकृत टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता. तो म्हणाला की, “हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करणे हा यामागचा उद्देश होता, मात्र हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर आणि क्रिकेटमधील बांधिलकीवर प्रश्न उपस्थित केले गेले. वर्षभर भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित सहभाग महत्त्वाचा आहे,दुखापती हा नक्कीच एक पैलू आहे, पण खेळाडूच्या पुनरागमनासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.”

हार्दिक पंड्याला विशेष सूट देण्यावर टीका –

इरफान पठाणने हार्दिक पंड्याला विशेष सूट देण्यावरही टीका केली आहे. इरफान पठाण म्हणाला, “जेव्हा इतर खेळाडू)पाहतात की एका खेळाडूला विशेष वागणूक मिळत आहे, तेव्हा ते संघाचे वातावरण बिघडवते. ज्यामुळे एक चुकीचा संदेश जातो. कारण हे क्रिकेट टेनिससारखे नाही, तो एक सांघिक खेळ आहे, जिथे समानता महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडूला न्याय्य आणि समानतेने वागवले पाहिजे.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘ड्रॉप इन पिचेस’ म्हणजे काय? ज्या खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार

बुमराह उपकर्णधारासाठी वाईट पर्याय नव्हता –

माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे मत आहे की हार्दिक पांड्या भारताचा उपकर्णधार होण्याचा हक्कदार नाही. इरफान पठाण म्हणाला, “म्हणून आता हार्दिक पड्याला उपकर्णधार बनवण्याबाबतच्या तुमच्या प्रश्नाकडे परत येत आहे, नेतृत्वात सातत्य राखण्याला महत्त्व असल्याने त्यामागील तर्क मला समजला आहे. तथापि, सध्याची कामगिरी लक्षात घेता, निवडकर्त्यांनी सातत्य निवडणे अर्थपूर्ण आहे. तरीही, माझा विश्वास आहे की बुमराहसारखा खेळाडू उपकर्णधारासाठी वाईट पर्याय नव्हता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik vice captaincy appointment for t20 wc challenged by irfan pathan bumrah wouldnt have been bad choice vbm