Haris Rauf Discusses and Shadab Khan’s Sportsmanship in Ind vs Pak Match: क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती नेहमीच चर्चेत असते. ही एक अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही खेळाडूचे व्यक्तिमत्त्व जगाला दाखवते. शनिवारी खेळला जाणारा आशिया चषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातीन सामना रद्द करण्यात आला, परंतु या सामन्यात खेळभावना चर्चेचा विषय ठरला. या सामन्यात दोन पाकिस्तानी खेळाडू आपल्या खेळभावनमुळे चर्चेत आले. हरिस रौफ आणि शादाब खान अशी या खेळाडूंची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम हरिस रौफबद्दल बोलूया, हरिस आणि शाहीनने सुरुवातीच्या विकेट्स घेत भारताच्या आघाडीच्या फळीचे कंबरडे मोडले. भारतीय संघ २०० धावांच्या आत गुंडाळला जाईल असे वाटत होते, परंतु इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यानंतर हरिसने इशान किशनला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर इशान किशनने एकच जल्लोष केला. त्याचबरोबर इशान तंबूत परतत असताना हातवारे करुन त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.

इशान किशन ३८व्या षटकात बाद झाला. तो ८१ चेंडूत ९ चौकार-२ षटकार ठोकत ८२ धावा करुन झेलबाद झाला. त्याने हा चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला, पण बॅटच्या वरच्या काठावर आदळला आणि बाबर आझमने त्याचा झेल घेतला. यानंतर हरिसने आपला राग काढला. त्याने उद्धटपणे इशानला हातवारे करुन बाहेर जायला सांगितले.

हेही वाचा – राहुल-किशनबद्दल बोलताना मोहम्मद कैफच्या वक्तव्यावर गौतम गंभीर संतापला; म्हणाला, ‘वर्ल्ड कप जिंकण्यासाठी नाव महत्त्वाचे की…’

आता शादाब खानबद्दल बोलूया, इशान आणि हार्दिक फलंदाजी करत असताना धावताना हार्दिकच्या बुटाच्या लेस सैल झाल्या. हार्दिक स्वतः काही करू शकण्याआधीच शादाब आला आणि त्याच्या लेसेस बांधायला लागला. शादाबच्या या वर्तनाने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. यानंतर ट्विटरवर ‘खेळ भावना’ सतत ट्रेंड करू लागली. मात्र, एका सामन्यात दोन वेगवेगळी दृश्ये पाहून चाहते एकीकडे शादाब खानचे कौतुक करत असताना दुसरीकडे हरिस रौफला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haris rauf discusses arrogance and shadab khans sportsmanship in ind vs pak match vbm