Dinesh Karthik on Haris Rauf: पाकिस्तान संघाची ‘स्पीड गन’ अशी ओळख असणाऱ्या हारिस रौफने आपल्या विलक्षण गोलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर क्रिकेट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत गोलंदाजी करायला टेनिस बॉलने सुरुवात केली होती. रौफच्या वेगापुढे अनेक दिग्गज फलंदाज फिके पडले आहे. त्याने पाकिस्तानसाठी ८५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आजकाल रौफ इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड मेन्स’ स्पर्धेत खेळत आहे. जिथे त्याने शुक्रवारी (४ ऑगस्ट) शानदार गोलंदाजी केली. वेल्श फायरचा भाग असलेल्या रौफने सदर्न ब्रेव्हजविरुद्ध २७ धावांत तीन विकेट्स घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज हारिस रौफचे कौतुक केले आहे आणि त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हटले आहे. माहितीसाठी की, हारिस रौफने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने पाकिस्तान संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा: ODI world cup: … तिसर्‍याचा लाभ! राहुल-अय्यरची दुखापत अन् शुबमनसाठी कोहली करणार ‘या’ गोष्टीचा त्याग?

दिनेश कार्तिकने हारिस रौफचे जोरदार कौतुक केले. त्याच्या मते, “भारताचा यॉंर्कर किंग जसप्रीत बुमराहपेक्षा हारिस हा फलंदाजांना अधिक धोकादायक गोलंदाज वाटतो.” माहितीसाठी, हारिस रौफने दक्षिणी ब्रेव्हविरुद्ध चांगली गोलंदाजी करत २० चेंडूत २७ धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. पाकिस्तान सुपर लीगमध्येही या खेळाडूने आपल्या जबरदस्त कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिनेश कार्तिकने स्काय स्पोर्ट्सवर सांगितले की, “काही वर्षांपूर्वी हारिस रौफ टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर संघाने त्याला सामील करून घेतले आणि तिथेही त्याने चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने पाकिस्तान संघातही चांगली गोलंदाजी केली. तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो केवळ पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत नाही, तर डेथ ओव्हर्समध्येही जबरदस्त गोलंदाजी करतो. त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज शेवटच्या षटकात आताच्या काळात क्वचितच असेल.”

हेही वाचा: IND vs AUS: वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून घेणार माघार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरिस रौफने उत्कृष्ट कामगिरी केली आहे

माहितीसाठी की, हारिस रौफने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ६२ टी२० सामन्यात ६७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३९ विकेट्स घेतल्या आहेत तर एका कसोटीत त्याने फक्त एक विकेट घेतली आहे. त्याने वेल्श फायरसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. या वर्षी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकही खेळवला जाणार आहे आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये हारिस रौफने चांगली गोलंदाजी करणे पाकिस्तान संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानला गोलंदाजीत चांगली सुरुवात करून देण्यास सक्षम आहेत आणि हे दोघेही विरोधी संघाविरुद्ध खूप मारक ठरू शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haris rauf is one of the finest fast bowlers in limited overs cricket at the moment says dinesh karthik avw
Show comments