Pak cricketer, Haris Rauf Wedding: पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हरिस रौफच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी, तो आपल्या पत्नीला लग्न करून घरी आणेल, त्यापूर्वी संपूर्ण विधीपूर्वक उत्सव केला जात आहे. मंगळवारी कव्वाली, बुधवारी मेहंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिला घेण्यासाठी गुरुवारी म्हणजे आज तो घोड्यावर बसून तिच्या घरी गेला होता.

हारिस रौफने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये (२०२२) लग्न केले होते. मग दोघांचे लग्न झाले, पण रुखसात (पाठवणी) झाली नाही. आता सध्या पाठवणीचा कार्यक्रम सुरू आहे. हरिस रौफ शुक्रवारी त्याची पत्नी मुझना मसूद मलिकला घरी आणणार आहे. शुक्रवारी लग्नाच्या आधी प्रत्येक दिवस साजरा केला जात आहे. ढोलकी आणि कव्वाली कार्यक्रमाने मंगळवारपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Royal wedding ceremony of Shri Vitthal Rukmini on occasion of Vasant Panchami in Pandharpur
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो
son-in-law dance with father-in-law
‘बाबा, असा जावई शोधून सापडणार नाही…’ भरमंडपात जावयानं भावी सासऱ्यांबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…
Mahakumbha mela 2025 Sadhu Wedding Video
महाकुंभ मेळ्यात पार पडला एका साधूचा भव्य विवाह सोहळा! अनेक साधूंची हजेरी; पण वाचा, सत्य काय?

बुधवारी सायंकाळी मेहेंदीचा कार्यक्रम होता. गुरुवारी हरिसने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. एका व्हिडिओमध्ये हारिस रौफ घोडीवर बसून त्याच्या सासुरवाडीत जात आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो स्पोर्ट्स बाईकवर एंट्री घेताना दिसत आहे. यावेळी त्याने कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यात छान दिसत होता. त्याचवेळी त्याच्या पत्नीचे फोटोही व्हायरल होत आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

कव्वाली नाईटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले

या जोडप्याच्या लग्नाचा सोहळा अधिकृतपणे सुरू होताच, कव्वाली नाईटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. एका व्हिडिओमध्ये, वेगवान गोलंदाज त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांमध्ये संगीत सोहळ्याचा आनंद घेत आहे. रौफने मॅचिंग ट्राउझर्ससह निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू सहभागी होतील

रौफच्या लग्नाला पाकिस्तान संघातील अनेक खेळाडू उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी हा विवाहसोहळा पार पडणार आहे. पाकिस्तान संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी प्रशिक्षण शिबिरासाठी कराचीमध्ये जमला आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये रौफच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी खेळाडूंना शिबिरातून सोडण्यात येणार आहे. ते शनिवारी कराचीमध्ये पुन्हा एकत्र येतील आणि त्याच दिवशी दुबईमार्गे श्रीलंकेला रवाना होतील.

हेही वाचा: Asian Games 2023: भारताचा कर्णधार पवन सेहरावतने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत सांगितले; म्हणाला, “जर तुम्हाला गोल्ड…”

कोण आहे मुजना मसूद मलिक?

हारिस रौफची पत्नी मुझना मसूद मलिक एक फॅशन मॉडेल, टिकटॉक स्टार आहे. रौफची पत्नी इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी इस्लामाबाद (IIUI) मध्ये BS मीडिया आणि कम्युनिकेशनची विद्यार्थिनी आहे. मुजना मसूद मलिकने आपल्या करिअरची सुरुवात लहान वयातच मॉडेल म्हणून केली होती. सध्या ती अनेक पाकिस्तानी फॅशन ब्रँडसोबत काम करत आहे. हरिसच्या पत्नीला इंग्रजी, उर्दू आणि पंजाबी या तीन भाषा येतात. मेकअपसोबतच ती फिटनेसचीही मोठी फॅन आहे.

Story img Loader