INDW vs WIW 2nd ODI Updates in Marathi: भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाजी हरलीन देओल हिने सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज महिला संघाविरूद्ध ११५ धावांची शानदार खेळी करत आपले पहिले शतक झळकावले आहे. हरलीन देओलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ३५० अधिक धावांचा टप्पा गाठला. हरलीन देओलने या शतकी खेळीत १०३ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण ११५ धावांची खेळी केली.

टीम इंडियाची युवा स्टार हरलीन देओलने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. तिचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. तिने अवघ्या ९८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात हरलीन फलंदाजीला आली जेव्हा टीम इंडियाने ११० धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर तिच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला. शतकी खेळी केल्यानंतर चौकारांचा पाऊस पाडत मग ती बाद झाली. हरलीनने ११.६५ च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त फलंदाजी केली.

ICC Champions Trophy 2025 Schedule Venues and Grounds in Marathi
ICC Champions Trophy 2025 Schedule: भारत-पाकिस्तान २३ फेब्रुवारीला आमनेसामने; आयसीसीने जाहीर केलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
IND vs AUS 4th Test Timing At What Time Melbourne Test Match Will Start in India
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? ४.३०ला होणार नाणेफेक
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Rohit Sharma Statement on Tanush Kotian Selection in Team India Said Kuldeep Did not have a Visa IND vs AUS
IND vs AUS: “कुलदीपकडे व्हिसा नाही आणि अक्षर…”, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, तनुष कोटियनला संधी देण्यामागचं सांगितलं खरं कारण
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा – Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय

भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी केली आणि भारताने वनडेच्या इतिहासातील वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध ५ बाद ३५८ धावा केल्या. तर दुसऱ्यांदा भारताने वनडेमध्ये ३५० अधिक धावांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “कुलदीपकडे व्हिसा नाही आणि अक्षर…”, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, तनुष कोटियनला संधी देण्यामागचं सांगितलं खरं कारण

भारताकडून सलामीला उतरलेल्या स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. यादरम्यान लयीत असलेल्या स्मती मानधनाने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि यानंतर ती ५३ धावा करत धावबाद झाली. तर प्रतिका रावने ७६ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक केले. कर्णधार हरमनप्रीत कौर २२ धावा करत बाद झाली तर जेमिमा रोड्रिग्जने ३६ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या खेळीसह ५२ धावा करत झटपट अर्धशतक पूर्ण केले. तर ऋचा घोषने २ चौकारांसह भारताची धावसंख्या ३५० पार नेत मोठी धावसंख्या उभारली.

हेही वाचा – IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? ४.३०ला होणार नाणेफेक

हरलीन देओलची कारकिर्द

हरलीन देओलने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३६ धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये हरलीनची सर्वोच्च धावसंख्या ७७ धावा होती, जी आता ११५ धावा झाली आहे. भारतासाठी २४ टी-२० सामन्यांमध्ये तिने २५१ धावा केल्या आहेत.

Story img Loader