गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील मानपाननाट्य चांगलंच गाजलं आहे. भारतीय महिला संघाची वरिष्ठ क्रिकेटपटू मिताली राज व प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद जाहीर झाल्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. दोघांपुरतं मर्यादित राहिलेलं हे भांडण आता संघात फूट पाडू लागलं असल्याचं दिसत आहे. कारण टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी रमेश पोवारला पाठिंबा दर्शवत त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी केली आहे.
प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत आणि स्मृतीने रमेश पोवारला पाठिंबा दर्शवला असून 2021 पर्यंत प्रशिक्षकपदी ठेवावं असं म्हटलं आहे. रमेश पोवारचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपला असून, बीसीसीआयने पदासाठी अर्ज मागवले आहेत. रमेश पोवार प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज करु शकतो.
‘हो त्यांनी पत्र लिहून रमेश पोवार पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी असावेत अशी मागणी केली आहे’, असं विनोद राय यांनी सांगितलं आहे. एकीकडे हरमनप्रीत आणि स्मृतीने रमेश पोवारला पुन्हा संधी देण्याची मागणी केली असताना, एकता बिश्त आणि मानसी जोशी यांनी मात्र विरोध दर्शवत मिताली राजला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे भारतीय संघात रमेश पोवारवरुन दोन गट पडले असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
वर्ल्ड टी-20 मध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या पराभवानंतर एका आठवड्यात रमेश पोवारचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. संघ व्यवस्थापनाने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्याआधी मिताली राजला संघातून वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मिताली राजने रमेश पोवार आणि प्रशासकीय समिती सदस्य डायना यांच्यावर आरोप करत आपलं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं होतं.
दुसरीकडे रमेश पोवारने ओपनिंग करण्यास नकार दिल्याने मिताली राजने वर्ल्ड टी-20 सुरु असतानाच निवृत्ती घेण्याची धमकी दिल्याचा तसंच गोंधळ घातल्याचा आरोप केला.
हरमनप्रीतने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘मी टी-20 संघाची कर्णधार आणि एकदिवसीय संघाची उप-कर्णधार या नात्याने पोवार यांना पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नेमण्याचं आवाहन करते. पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी फक्त 15 महिने बाकी आहेत आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी फक्त एक महिना बाकी आहे. ज्याप्रकारे रमेश पोवार यांनी संघात बदल केले आहेत, ते पाहता त्यांना बदलण्यामागे कारण दिसत नाही’.
रमेश पोवार यांनी पूर्णवेळ प्रशिक्षकपदी आणल्यापासून संघात सुधारणा झाल्याचं हरमनप्रीत आणि स्मृतीचं म्हणणं आहे. ‘रमेश पोवार सरांनी खेळाडू म्हणून आमच्यात सुधारणा केली आहे. त्यांनी टार्गेट ठेवण्यात आणि आपल्या क्षमतांना आव्हान देण्यास आम्हाला मदत केली. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचा चेहराच बदलला आहे. तांत्रिक आणि धोरणात्मक दोन्ही पद्धतीने. त्यांनी आमच्यात जिंकण्याची भावना जागी केली आहे’, असंही हरनप्रीतने पत्रात म्हटलं आहे.
यावेळी हरमनप्रीतने मिताली राजला संघातून वगळण्याच्या निर्णयाला एकटे रमेश पोवार जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी आणि भुतकाळातील निरीक्षण आहे असंही तिने सांगितलं आहे. प्रशिक्षक बदलल्यास संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल अशी भीतीही तिने व्यक्त केली आहे.