जिंकण्यासाठी मिळालेलं लक्ष्य आवाक्याबाहेर जात असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने साकारलेल्या अद्भुत खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत दिमाखदार विजय साकारला. या स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हरमनप्रीत कौर खेळायला उतरली तेव्हा मुंबई इंडियन्स संघाला तेव्हा ६९ चेंडूत १२२ धावांची आवश्यकता होती. धावगतीचं आव्हान १०.६६ असं प्रचंड झालं होतं. अशा परिस्थितीत ४८ चेंडूत नाबाद ९५ धावांची तडाखेबंद खेळी साकारत हरमनप्रीतने मुंबईला थरारक विजय मिळवून दिला. तिने १० चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या ९५ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर हातातून निसटलेला सामना मुंबई इंडियन्सला जिंकून दिला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापूर्वी गुजरात जायंट्स संघाने चार सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवला होता. हा सामना गुजरातसाठी अधिक महत्त्वाचा होता आणि ही बाब लक्षात घेऊन संघाने चमकदार कामगिरी केली. पण मुंबईच्या संघानेही शेवटपर्यंत हार नाही मारली आणि गुजरातकडून विजय हिसकावून घेतला. मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे महिला प्रिमीयर लीग २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

मुंबई इंडियन्सच्या हरमनप्रीत कौरच्या अनुभवी स्नेह राणाच्या एका षटकात तब्बल २४ धावा कुटल्या. सामन्याचे अठरावे आणि महत्त्वाचे षटक स्नेह राणाला सोपवली पण कौरने मात्र तिची बेदम धुलाई केली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू षटकारासाठी धाडला, सगल दोन चौकार आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारत तिने मैदानात आतिषबाजी केली. हे षटक मुंबई इंडियन्ससाठी टर्निंग पॉईंट ठरले.

h

प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या संघाने ७ बाद १९० धावा केल्या. बेथ मुनी (६६) आणि हेमलता (७४) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पहिल्या १० षटकांत धावांचा पाऊस पाडला. एका क्षणाला संघ २०० धावांचा टप्पा गाठणार असे चित्र दिसत असताना मुंबईच्या संघाने जोरदार पुनरागमन केले. एकापाठोपाठ गुजरात संघाने ५ विकेट्स गमावले आणि त्यामुळे संघांच्या धावांचा वेग कमी झाला. मुंबई संघाकडून साईका इशाकने २ विकेट्स तर सजना सजीवन, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल आणि हॅली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीची सुरूवात चांगली झाली. सुरूवातीपासूनच यस्तिका भाटीया आक्रमक फलंदाजी केली पण तिला अर्धशतक झळकावला आले नाही आणि ४९ धावा करत ती बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि यस्तिका भाटीया यांच्याव्यतिरिक्त कोणीही फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harmanpreet kaur 94 runs innings made mumbai indians beat gujarat giants by 7 wickets in wpl 2024 bdg
Show comments