Women’s T20 World Cup 2023 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये, २३ फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियन संघाने ५ धावांनी जिंकला. या दरम्यान भारतीय चाहत्यांना पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कप २०१९ मधील एमएस धोनीचा धावबादची आठवण झाली. कारण भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर देखील तशीच धावबाद झाली.
महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत कौर ज्या प्रकारे धावबाद झाली. त्याचप्रमाणे, पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी धावबाद झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते धोनीची आठवण काढत आहेत. उपांत्य फेरीत हरमनप्रीत आणि धोनीचे बाद होण्याचे प्रकार सारखेच आहेत. २०१९ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध धोनीदेखील अशा प्रकारे बाद झाला होता.
७ नंबरच्या जर्सीचा अजब योगायोग –
दरम्यान ७ नंबरची जर्सी घातलेल्या एमएस धोनी काही इंचांनी मागे राहिल्याने बाद झाला होता. त्याचप्रमाणे ७ नंबरची जर्सी परिधान केलेली भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसोबतही असेच घडले. योगायोगाने, ही देखील उपांत्य फेरी होती, जर्सी क्रमांक सुद्धा ७ होता, तसेच धोनी कर्णधारांनीही अर्धशतक पूर्ण केले होतो आणि काही इंचांच्या फरकाने धावबाद झाले. मात्र, एमएस धोनी डायरेक्ट हिटलर धावबाद झाला आणि हरमनप्रीत कौरसाठी यष्टिरक्षकाला स्टंप उडवावे लागले.
कौर आणि धोनीचा योगायोग –
विशेष म्हणजे, पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत, माजी कर्णधार एमएस धोनी न्यूझीलंडविरुद्ध क्रीजवर उपस्थित होता आणि त्या वेळी संघाला विजयासाठी ११ चेंडूत ३३ धावांची गरज होती. धोनी त्याचवेळी रनआउट झाला असला तरी, त्यानंतर टीम इंडियासाठी सामना गमावणे मोठे होते. मात्र, तेच महिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्येही पाहायला मिळाले आहे. जोपर्यंत कर्णधार हरमनप्रीतही क्रीजवर होती तोपर्यंत टीम इंडियाचा विजय दिसत होता. संघाला विजयासाठी ३६ चेंडूत ४५ धावांची गरज होती, त्यानंतर हरमनप्रीतही धावबाद झाली.
धोनीसोबत काय झाले होते?
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीतील सामना जिंकण्याच्या मार्गावर होता, परंतु एमएस धोनी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. धोनीने डाईव्ह मारली असती तर कदाचित तो वाचला असता. त्याने डाईव्ह मारली नाही आणि मार्टिन गुप्टिलचा एक थ्रो डायरेक्ट स्टंपला लागला आणि काही इंचाने धोनी धावबाद झाला.
हेही वाचा – INDW vs AUSW: ‘मैं नहीं चाहती कि मेरा देश मुझे…’, पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर झाली भावूक
हरमनसोबत काय झाले?
हरमप्रीत कौरने अर्धशतक झळकावले होते आणि ती लयीत दिसत होती. तिने डीपकडे चेंडू खेळला, जिथे तिला दुसरी धाव सहज मिळू शकली असती. दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी, थ्रो विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये येण्यापूर्वी तिने आपली बॅट जमिनीवर ठेवली आणि पुढे सरकवक नेण्याचा प्रयत्न केला. बॅट काही इंच पुढे गेली, पण क्रीजच्या काही इंच आधी अडकली. दरम्यान, यष्टिरक्षकाने यष्टी उधळल्या. थर्ड अंपायरने तपासले तेव्हा हरमन क्रीजच्या बाहेर होती.