भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ रोजी एक इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला आहे. हरमनप्रीत कौर आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटर बनली आहे. या प्रकरणात आता रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे दोन्ही क्रिकेटपटू भारतीय आहेत.

हरमनप्रीत कौर जेव्हा आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या गट बी लीग सामन्यात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरली. तेव्हा तिचा हा १४९ वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याच वेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-२०आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४८ सामने खेळले आहेत. या यादीत तिसरे नाव आहे न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स आहे, जिने आतापर्यंत १४० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Rohit sharma starts training ahead of england and Champions Trophy running at the BKC in Mumbai video goes viral
Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Rohit Sharma to Play International Cricket Till Champions Trophy Unlikely play England Test Series According to Reports
Rohit Sharma: रोहित शर्मासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची स्पर्धा? ‘या’ दिवशी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता; मोठी अपडेट आली समोर
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

पॅरीने रोहितला टाकले मागे –

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पॅरीने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत एलिस पॅरीने आता रोहितला मागे टाकले आहे. रोहितने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ३९ सामने खेळले आहेत, तर १८ फेब्रुवारी रोजी एलिस पॅरीने तिचा ४० वा टी-२० विश्वचषक सामना खेळला.

हेही वाचा – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: सौराष्ट्राची सामन्यावर मजबूत पकड

सामन्याबद्दल बोलायचे तर, दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात शनिवारी (१८ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना संपन्न झाला. इंग्लंडने टीम इंडियाचा ११ धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान अबाधित राखले आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १५२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु प्रत्युत्तरात भारतीय संघाला ५ बाद १४० धावाच करता आल्या.

हेही वाचा – ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा (महिला): इंग्लंडच्या महिलांकडून भारताचा पराभव; स्मृती, रिचाचे प्रयत्न अपयशी; नॅट स्किव्हरची निर्णायक खेळी

धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधनाने झुंजार अर्धशतक केले मात्र ते भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. रिचा घोषची शेवटच्या षटकातील फटकेबाजी देखील टीम इंडियाला पराभवापासून वाचवू शकली नाही. तिन्ही सामन्यात ती नाबाद राहिली.

Story img Loader