Harmanpreet Kaur Runout Controversy: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीय संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पराभवामागे कर्णधार हरमनप्रीत कौरची धावबाद हे कारण ठरले.

हरमनप्रीत कौरच्या रनआउटवरून गदारोळ सुरू झाला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितले होते की, ती ज्या पद्धतीने धावबाद झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलिसा हिली मात्र हे मान्य करत नाही. या संपूर्ण प्रकरणात एलिसा हिलीने हरमनप्रीत कौरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हरमनप्रीत कौरने क्रीजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, असे एलिसाचे मत आहे.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”

‘एबीसी स्पोर्ट्स’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एलिसा हिली म्हणाली, “हे एक विचित्र प्रकरण आहे. हरमनप्रीत म्हणू शकते की ती दुर्दैवी होती. पण माझा विश्वास आहे की तिच्या प्रयत्नांची कमतरता होती आणि ती कदाचित क्रीजपर्यंत पोहोचली असती. तिने प्रामाणिक प्रयत्न केले असते, तर ते फक्त दोन मीटरचे होते. आम्हाला त्याबद्दल कोणतीही शंका नाही.”

एलिसा हिली म्हणाली, “तुम्ही असे म्हणू शकता की तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य कमनशिबी राहिला, परंतु हे सहसा त्या वेळी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि उर्जेबद्दल असते. ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आपण विशेषत: खेळादरम्यान बोलतो. हे त्या छोट्या मूलभूत गोष्टींमध्ये विरोधी संघापेक्षा चांगल्या करण्याबद्दल आहेत. त्यामुळे मोठ्या स्पर्धा जिंकल्या जाऊ शकतात. मला वाटते की आम्ही ते खूप चांगल्या प्रकारे करत आहोत.”

हेही वाचा – Jasprit Bumrah Injury: टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; बुमराह IPL 2023 आणि WTC फायनलमध्ये खेळणे साशंक

त्या सामन्यादरम्यान, भारतीय डावाच्या १५व्या षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीत कौर धावबाद झाली. त्यादरम्यान हरमनप्रीतची बॅट अडकली आणि गार्डनरच्या थ्रोवर तिला एलिसा हिलीने धावबाद केले. सामना संपल्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, “यापेक्षा जास्त दुर्दैवी वाटू शकत नाही. जेमिमासोबतच्या भागीदारीमुळे आम्ही चांगल्या स्थितीत होता. मी ज्याप्रकारे धावबाद झाले यापेक्षा दुर्दैवी दुसरे काहीही असू शकत नाही. असा प्रयत्न करून सामना शेवटच्या षटकापर्यंत नेल्याबद्दल आम्ही खुश आहोत.”

Story img Loader